भूम राजकीय कट्टा वृत्तसेवा
आरोग्यदूत डॉ.राहुल घुले यांचा आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी शिवसेना शिंदे गटात राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री डॉ.प्रा.तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत पुणे येथे हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश झाला.
या वेळी बोलताना महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी डॉ.राहूल घुले यांना तुम्ही तालुका सांभाळा मी राज्य सांभाळतो असे आवाहान केले.मी मोठा भाऊ व तुम्ही माझे लहान भाऊ आपण दोघे भाऊ भाऊ मिळून खांद्याला खांदा लावून मतदार संघाचा विकास करू. असे आश्वासन दिले .

यापुढे आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम करणार असून भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातून त्यांना एक लाखाच्या फरकाने जिंकून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार असल्याचे या पक्षप्रवेशाचे वेळी आरोग्यदूत डॉ.राहुल घुले यांनी सांगितले.

सोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष भाऊसाहेब मुंडे, सचिन जाधव, बालाजी कुटे, श्रीकांत कुटे, श्रवण बोंदर्डे, मैनुद्दीन शेख , सलीम पठाण, मुर्तुज सय्यद, बाबा पठाण, कानिफनाथ सरपणे, जाहीर शेख, नवनाथ गावडे, रघुनाथ गावडे, नवनाथ खरसडे, जुबेर शेख, आनंद वायकुळे, लक्षमन साबळे,नितीन जाधव, आप्पासाहेब भोसले, सूर्यकांत भोसले, आश्रुबा भोसले, शुभम खारगे, गणेश कावळे, शंकर हुंबे, वैभव देशमुख, रतीलाल मिस्कीन, बाळासाहेब रेवडकर, रोहित पाटील, रोहन गायकवाड, चंद्रकांत दोरगे, इत्यादी सह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा संपन्न झाला.













Users Today : 32
Users Yesterday : 67
This Month : 1824
Total Users : 27252