Sunday, March 22, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

अर्चनाताई पाटील यांना निवडून आणण्यासाठी छातीचा कोट करू-पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत

Rajkiy Katta by Rajkiy Katta
19 April 2024
in राजकीय
0
अर्चनाताई पाटील यांना निवडून आणण्यासाठी छातीचा कोट करू-पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा

धाराशिव हा शिवसेनेचा पारंपारिक मतदार संघ.पण केवळ महायुतीचा धर्म पाळण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी हा कडवट शिवसैनिक अर्चनाताई पाटील यांच्या मागे पूर्ण ताकदिने उभा आहे. त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी हा तानाजी सावंत छातीचा कोट करून उभा आहे, अशा भावना राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी आज व्यक्त केल्या.

धाराशिव लोकसभा मंतसंघातून आज माहायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला. यावेळी आयोजीत प्रचार रॅलीमध्ये तानाजी सावंत बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत,औसाचे आ.अभिमन्यू पवार,राणाजगजितसिंग पाटील, माजी मंत्री बसवराज पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर,आमदार विक्रम काळे, महाविकास आघाडीचे उमेदवार अर्चना पाटील,सुरेश बिराजदार आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना सावंत म्हणाले, धाराशिव लोकसभा मतदारसंघांचा प्रचार हा जानेवारीमध्येच मी सुरू केला आहे. हा मतदारसंघ कडवट शिवसैनिकाचा मतदारसंघ आहे. तरीसुद्धा महायुतीचा धर्म पाळण्यासाठी आम्ही हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडला. मात्र, ज्या वेळेस पुढच्या व्यासपीठावर येऊ त्यावेळेस समोरच्याचा फडश्या पाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. अशाच पद्धतीने जर माझ्या शिवसेनेचा एक एक मतदारसंघ कमी होवू लागला तर हा शिवसैनिक कधीही सहन करणार नाही. मात्र, यावेळेस ‘अबकी बार चारसो पार’करून विश्वनेता नरेंद्र मोदी यांना आपल्याला पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे आपलं दुःख विसरून माझ्या तमाम शिवसैनिकांना माझा मानाचा मुजरा आणि कळकळीची विनंती आहे की, प्रचारात सगळ्यांच्या पुढे घड्याळांचे पदाधिकारी असतील त्याच्याही पुढे शिवसैनिकांनी उभे राहून अर्चना ताईंना लीड मिळवून द्यायचा आहे.

आमदार विक्रम काळे म्हणाले, आपल्या जिल्ह्याला 23 टीएमसी पाणी आणण्यासाठी आपण सर्वांनी मिळून अजित दादांना खंबीर साथ देणे गरजेचं आहे. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजित दादांनी आपल्या सर्व शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पिक विमा देण्याचा निर्णय सरकारमध्ये असताना घेतलेला आहे. आज अनेकांना त्याचा फायदा होत आहे. यापुढे देखील अर्चना ताईंना लीड मिळवून देण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करा असे आवाहन देखील त्यांनी केले.

Previous Post

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनिल चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश

Next Post

आधी सास-याला निवडून दिले आता सुनेला निवडून द्या-अजित पवार

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025
Next Post
आधी सास-याला निवडून दिले आता सुनेला निवडून द्या-अजित पवार

आधी सास-याला निवडून दिले आता सुनेला निवडून द्या-अजित पवार

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483458
Users Today : 29
Users Yesterday : 139
This Month : 1138
Total Users : 30823
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group