Monday, March 23, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

सुनील चव्हाण हे मालक म्हणून तर आपण पालक म्हणून काळजी घेणार-आ.राणाजगजितसिंह पाटील

Rajkiy Katta by Rajkiy Katta
1 May 2024
in राजकीय
0
सुनील चव्हाण हे मालक म्हणून तर आपण पालक म्हणून काळजी घेणार-आ.राणाजगजितसिंह पाटील
0
SHARES
1
VIEWS

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा-

धाराशिव लोकसभेच्या तिसऱ्या टप्यात धाराशिव लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे.  काल या मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा पार पडली. अवघ्या काही दिवसांवर मतदान येऊन ठेवलेल्या या महत्वपूर्ण मतदारसंघात महायुतीने काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन व आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या  कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत धाराशिव तालुक्यातील काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, विविध गावांतील सरपंच,उपसरपंच,सदस्य व असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. 

 भाजपा कार्यालय, प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथे संपन्न झालेल्या या प्रवेश सोहळ्यात काँग्रेस पक्षातून भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सरडे, तालुकाध्यक्ष  रोहित पडवळ, काजळाचे माजी पं.स.सदस्य  आश्रुबा माळी,समुद्रवाणी येथील अशोक शिंदे, बलभीम जाधव, दारफळ येथील सरपंच रवींद्र जाधव, वरुडाचे सरपंच खंडेराव गाढवे, केशेगावचे सरपंच अभिजित पाटील, देवळालीचे संतोष गायकवाड, मेडसिंगाचे उपसरपंच  किशोर आगळे, आंबेडकर साखर कारखान्याचे संचालक सुग्रीव कांबळे, पाटोदाचे युवराज परतापुरे, कौडगावचे (बावी) आकाश कदम, तेर येथील शिवाजी तात्या चौगुले, महाळंगीचे  बालाजी ढवळे, नांदुर्गाचे अंगद पवार, करजखेडाचे  बालाजी आदटराव, विठ्ठलवाडीचे नानाजी लांडगे, बरमगावचे राम पवार, इर्लाचे  हारून पटेल, जहागीरदार वाडीचे  विक्रम चव्हाण, तोरंबाचे बहादूर तांबोळी, सांगवीचे राजकुमार बचाटे, कोल्हे गावचे बालाजी धायगुडे, वाघोलीचे  मुकुंद पाटील, लासोनाचे राजेश सुतार यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. या सर्वांचे भाजपा मध्ये स्वागत करून  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शुभेच्छा दिल्या..

यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, डॉ.पद्मसिंहजी पाटील  आणि  मधुकरराव चव्हाण  यांनी जनतेसाठी केलेले काम सर्वांना माहिती आहेच. आपल्याला देखील असेच प्रामाणिक काम करायचे आहे. कार्यकर्त्यांनी एकजुटीने व एकमेकांवर विश्वास ठेऊन काम करावे. जिल्ह्यात मोठे प्रकल्प, योजना आणायच्या असून यासाठी आपली खंबीर साथ असायला हवी आहे. प्रवेश करणा-या कार्यकर्त्यांनी यापुढे निश्चिंत रहावे‌.सुनील चव्हाण हे मालक म्हणून तर आपण पालक म्हणून पक्षात आपली काळजी घेणार आहोत.
प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातून महायुतीच्या उमेदवार  अर्चना पाटील यांना निवडून आणण्यासाठी मेहनत घेणार असल्याचे सांगितले.. यावेळी  सुनील चव्हाण, ज्येष्ठ नेते  सुरेशभाऊ देशमुख, माजी नगराध्यक्ष  मधुकरराव तावडे, माजी नगराध्यक्ष  संपतराव डोके,युवराज नळे, दर्शन कोळगे,प्रल्हाद धत्तुरे,पदाधिकारी कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना क्लीनचिट

Next Post

विकासपुरूष नरेंद्र मोदी यांच्यामागे उभे राहण्याची ही वेळ-आ.राणाजगजितसिंह पाटील

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025
Next Post
विकासपुरूष नरेंद्र मोदी यांच्यामागे उभे राहण्याची ही वेळ-आ.राणाजगजितसिंह पाटील

विकासपुरूष नरेंद्र मोदी यांच्यामागे उभे राहण्याची ही वेळ-आ.राणाजगजितसिंह पाटील

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483517
Users Today : 48
Users Yesterday : 40
This Month : 1197
Total Users : 30882
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group