Sunday, March 22, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या निकालाची उज्वल परंपरा कायम;15 विद्यार्थ्यांनी मिळवले १००% गुण

Rajkiy Katta by Rajkiy Katta
28 May 2024
in शैक्षणिक बातमी
0
श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या निकालाची उज्वल परंपरा कायम;15 विद्यार्थ्यांनी मिळवले १००% गुण
0
SHARES
41
VIEWS

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा -धाराशिव येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले हायस्कूलने दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही एस.एस.सी.बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले असून तब्बल 15 विद्यार्थ्यांनी 100 % गुण अर्जित केले असून प्रशालेचा एकूण निकाल 98 .97 % इतका लागला आहे.
प्रशालेतून प्रथम हर्षद संतोष तोडकरी , द्वितीय प्राची युवराज सुर्यवंशी , तृतीय महादेव शिवाजी शेलार असून यांना 100 % गुण प्राप्त झाले आहेत .
महाराष्ट्रातील सर्वात मोठी विद्यार्थी संख्या असलेल्या या मराठी प्रशालेत या वर्षी 10 वीला 877 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते .

यापैकी 90 ते 99 % घेतलेले 183 विद्यार्थी तर 70 ते 89 .99 % घेतलेले 42 1
तर 35 ते 69. 99% घेतलेले 249 विदयार्थी असे 877 पैकी तब्बल 868 विद्यार्थी पास झाले आहे . फक्त 9 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असले तरी ते 11 वीला प्रवेशासाठी पात्र झाले आहेत.
या यशाबद्दल संस्थेच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचे व पालकांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी केला या वेळी आपल्या भाषणात ते म्हणाले की , धाराशिव मध्येही आता वैद्यकिय व अभियंत्रिकी शिक्षणासाठी असलेल्या पूर्वतयारीची श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेजमध्ये उत्तम तयारी करून घेण्यासाठी फोटॉन बॅच उपलब्ध केली असून त्यासाठी कोटा , दिल्ली या सारख्या ठिकाणाहून आणलेल्या तज्ञ अध्यापक वर्ग १० वर्षापासून कार्यरत असून अनेक विद्यार्थ्यांनी या दोन्ही पूर्व परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेले आहे , असे सांगितले त्यामुळे आपल्या पाल्यांना इतरत्र पाठवण्यापेक्षा येथे ठेवावे , असेही त्यांनी आवर्जून नमूद केले .

यावेळी संस्था सचिव प्रेमाताई पाटील , मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील , संस्था सदस्य संतोष कुलकर्णी , संस्था सदस्य तथा फाऊडेशन बॅच चे प्रमुख यु.व्ही . राजे ,प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख , प्राचार्य नंदकुमार नन्नवरे , उपप्राचार्य संतोष घार्गे , उपमुख्याध्यापक प्रमोद कदम तर १० वीचे पर्यवेक्षक यशवंत इंगळे व सर्व पर्यवेक्षक , गुणवत्ता सुधार समितीचे प्रमुख मनोज भुसे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी व पत्रकार आणि विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत पाटील यांनी केले तर शेवटी आभार प्राचार्यांनी मानले .

Previous Post

अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून वीजपुरवठा सुरळीत करा

Next Post

दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत वालवडच्या वतीने सत्कार

Related Posts

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तेजस्विनीची चमकदार झेप;वर्ग 2 अधिकारीपदाला घातलेली गवसणी ग्रामीण मुलींसाठी प्रेरणादायी
शैक्षणिक बातमी

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तेजस्विनीची चमकदार झेप;वर्ग 2 अधिकारीपदाला घातलेली गवसणी ग्रामीण मुलींसाठी प्रेरणादायी

12 September 2025
वैद्यकीय क्षेत्राकडे सेवाभावाने पाहावे – डॉ.रमेश जाधवर
शैक्षणिक बातमी

वैद्यकीय क्षेत्राकडे सेवाभावाने पाहावे – डॉ.रमेश जाधवर

17 August 2025
साई कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे बीसीएस व बीसीए परीक्षेत घवघवीत यश
शैक्षणिक बातमी

साई कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे बीसीएस व बीसीए परीक्षेत घवघवीत यश

9 July 2025
१२ वीचा निकाल ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार – महाराष्ट्र राज्य बोर्डाची अधिकृत माहिती
शैक्षणिक बातमी

१२ वीचा निकाल ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार – महाराष्ट्र राज्य बोर्डाची अधिकृत माहिती

4 May 2025
“डीएड-बीएड विद्यार्थ्यांना दिलासा! बुद्धिमत्ता व शिक्षक अभियोग्यता परीक्षेची नवीन नियमावली लागू”
Blog

“डीएड-बीएड विद्यार्थ्यांना दिलासा! बुद्धिमत्ता व शिक्षक अभियोग्यता परीक्षेची नवीन नियमावली लागू”

2 May 2025
वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४०३.८९ कोटींच्या कामास प्रशासकीय मान्यता, जागतिक आरोग्य दिनी राज्य सरकारकडून ऐतिहासिक निर्णय -आ.राणाजगजिसिंह पाटील यांची माहिती
राजकीय

वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४०३.८९ कोटींच्या कामास प्रशासकीय मान्यता, जागतिक आरोग्य दिनी राज्य सरकारकडून ऐतिहासिक निर्णय -आ.राणाजगजिसिंह पाटील यांची माहिती

8 April 2025
Next Post
दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत वालवडच्या वतीने सत्कार

दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत वालवडच्या वतीने सत्कार

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483449
Users Today : 20
Users Yesterday : 139
This Month : 1129
Total Users : 30814
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group