Sunday, March 22, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

शिवसेना फोडण्याचं पाप ओमराजेंनी केलंय,कामापेक्षा भोंगा जास्त-वंचितच्या आंधळकरांची जहरी टिका

Rajkiy Katta by Rajkiy Katta
16 April 2024
in राजकीय
0
शिवसेना फोडण्याचं पाप ओमराजेंनी केलंय,कामापेक्षा भोंगा जास्त-वंचितच्या आंधळकरांची जहरी टिका
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा-आगामी लोकसभा निवडणुकीसाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत अटळ झाली आहे. महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला महायुतीकडून अर्चना पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. मात्र या दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होत असताना वंचितकडून भाऊसाहेब आंधळकर यांना उमेदवारी दिल्याने याठिकाणी तिन्ही उमेदवारांमध्ये जोरदार टक्कर बघायला मिळणार आहे. अशातच आता भाऊसाहेब आंधळकर यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर सडकून टिका केली आहे. तर शिवसेना फोडण्याचं पाप देखील ओमराजे निंबाळकर यांनी केल्याचा आरोप त्यांनी लावला आहे.

यातच ‘ज्या तरूणांनी माझी सेल्फी काढली आहे. तेवढं तरी मतदान पडलं तरी निवडून येईल’. या विधानावर भाऊसाहेब आंधळकर यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार घणाघात केला. ते म्हणाले की, सेल्फी काढून सेल्फी काढली म्हणजे तुला मतदान होणार असं काही नाही. असं असेल तर आपल्या मतदारसंघात लाखो हजारो सेल्फी माझ्या आहेत. मात्र कामापेक्षा भोंगा जास्त अशा पद्धतीने ओमराजे निंबाळकर यांचा कारभार चाललं आहे. काम करायची नाही फक्त फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हे केलं ते केलं सांगतो आहे.

आपल्या मतदारसंघातील प्रत्येक समाज, प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही करत आलो आहे. नुसतं सेल्फी काढून इथं गेलो, तिथं गेलो असं चालणार नाही. आपल्या मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांना प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा देखील भाऊसाहेब आंधळकर यांनी निंबाळकर यांना दिला आहे.

पोलिस खात्यात धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या ११ वर्षांत खुप काम केलं आहे. कोरोना सारख्या महामारित देखील आमच्यासारखं काम कुणीही केलं नाही. मात्र मतदारसंघात काम करत असतांना ओमराजे निंबाळकर यांनीच काम करू दिलं नाही. त्यांनीच वरिष्ठांकडू चहाड्या केल्यात.गेल्या काही घटनांवरून असं लक्षात येतं की, जनता राजकीय नेत्यांसोबत राहिलेले नाहीत. त्यामुळे जो काम करेल त्याच्यासोबत जनता राहणार आहे. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.

Previous Post

कावळेवाडी येथे भाजपला खिंडार; अनेक युवकांचा शिवसेना (उबाठा)पक्षात जाहीर प्रवेश

Next Post

लाखो महिलांना आत्मनिर्भरतेचे ‘वाण’ देणाऱ्या अर्चनाताई पाटील 

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025
Next Post
“ढोकी गावाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही”, अर्चना पाटलांची ग्वाही

लाखो महिलांना आत्मनिर्भरतेचे 'वाण' देणाऱ्या अर्चनाताई पाटील 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483433
Users Today : 4
Users Yesterday : 139
This Month : 1113
Total Users : 30798
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group