Sunday, March 22, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

महायुतीच्या उमेदवाराला मत म्हणजे नरेंद्र मोदी यांना समर्थन-प्रफूल्ल पटेल

Rajkiy Katta by Rajkiy Katta
3 May 2024
in राजकीय कट्टा
0
महायुतीच्या उमेदवाराला मत म्हणजे नरेंद्र मोदी यांना समर्थन-प्रफूल्ल पटेल
0
SHARES
2
VIEWS

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा –

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यात धारशिव मध्ये मतदान होणार आहे. अवघ्या काही दिवसांवर मतदान येऊन ठेपल्याने या मतदारसंघात प्रचाराने वेग घेतला आहे. काशी विश्वेश्वरप्रमाणेच तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राचा कायापालट पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की करतील. महायुतीच्या उमेदवाराला मत म्हणजे नरेंद्र मोदी यांना समर्थन होय. त्यातून जिल्ह्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

महायुतीच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना पटेल म्हणाले, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा आम्ही जपला आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकासासाठी नरेंद्र मोदी यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. मोदीजींनी देशाचा चेहरा मोहरा बादळण्याचे काम केले.  त्यांनी अगदी छोट्या – छोट्या कामातून आपल्या कार्याची सुरुवात केले, जनधन, प्रधानमंत्री आवास योजना, नळ योजना, आयुष्यमान भारत  यामधून त्यांनी खालच्या वर्गाला  वर आणण्याचे काम केले. त्यांना जनसामान्यांचे दुखणे माहिती आहे.  आज आपले शेजारील राष्ट्र चीन, पाकिस्तान आपल्याकडे नजर वर घेऊन बघत नाही, विश्वातील सर्व राष्ट्रांत आपला दबदबा वाढला आहे, भारतिय माणसाला सन्मान मिळत असतो तो मोदी यांच्यामुळेच. हे सर्व मोदी यांच्या स्थिर सरकार मुळेच  शक्य झाले आहे. 

धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वे मार्गाचे काम 2019 साली मंजूर झाले, मात्र अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांच्याकडून  एक रुपायाही मिळाला नाही, शिंदे सरकार येताच 450 कोटींचा निधी मिळाला. पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, तो सोडविण्यासाठी अकरा हजार कोटी रुपयांची गरज आहे, ते काम फक्त मोदीजी करू शकतात यामुळे अर्चना पाटील यांना मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवून द्या. पाण्याचा प्रश्न नरेंद्र मोदी यांच्या मदतीने दूर झाल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी शेवटी नमुद केले.

Previous Post

निधीचा ओघ आपल्याकडे वळविण्यासाठी निवडून येणारा खासदार हा आपल्या हक्काचा असावा -आ.राणाजगजिसिंह पाटील

Next Post

मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांची आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतली भेट

Related Posts

तेरखेडा जिल्हा परिषद गटासाठी पैलवान ग्रुपचे अध्यक्ष विकी चव्हाण यांची दावेदारी मजबूत
Blog

तेरखेडा जिल्हा परिषद गटासाठी पैलवान ग्रुपचे अध्यक्ष विकी चव्हाण यांची दावेदारी मजबूत

14 October 2025
मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदे आणि माजी मंत्री डॉ.तानाजी सावंत यांची महत्त्वपूर्ण भेट; पुनरागमनाच्या चर्चांना उधान
राजकीय कट्टा

मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदे आणि माजी मंत्री डॉ.तानाजी सावंत यांची महत्त्वपूर्ण भेट; पुनरागमनाच्या चर्चांना उधान

23 August 2025
धाराशिव भाजप जिल्हाध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची नियुक्ती
राजकीय कट्टा

धाराशिव भाजप जिल्हाध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची नियुक्ती

13 May 2025
केंद्रीयमंत्री राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे मुख्यमंत्री पदाबाबत मोठे विधान
राजकीय

केंद्रीयमंत्री राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे मुख्यमंत्री पदाबाबत मोठे विधान

30 November 2024
नात्यागोत्याचे  राजकारण विकासाच्या आड येऊ देऊ नका – प्रा. डॉ.तानाजीराव सावंत
Blog

नात्यागोत्याचे राजकारण विकासाच्या आड येऊ देऊ नका – प्रा. डॉ.तानाजीराव सावंत

12 November 2024
धाराशिव – कळंब मतदार संघात शिवसेना महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांच्या विजयासाठी शिवसैनिक एकत्र, मुख्यमंत्री शिंदे यांना पुन्हा सत्तेवर आणण्याचा निर्धार
राजकीय

धाराशिव – कळंब मतदार संघात शिवसेना महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांच्या विजयासाठी शिवसैनिक एकत्र, मुख्यमंत्री शिंदे यांना पुन्हा सत्तेवर आणण्याचा निर्धार

11 November 2024
Next Post
मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांची आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतली भेट

मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांची आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतली भेट

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483433
Users Today : 4
Users Yesterday : 139
This Month : 1113
Total Users : 30798
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group