Monday, March 23, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

चाळीस वर्षातील पाटील घराण्याच्या सत्ता काळात 25 वर्ष स्व.पवनराजे हेच कारभारी होते-पाटील दांपत्याचा प्रहार

Rajkiy Katta by Rajkiy Katta
4 May 2024
in राजकीय
0
चाळीस वर्षातील पाटील घराण्याच्या सत्ता काळात 25 वर्ष स्व.पवनराजे हेच कारभारी होते-पाटील दांपत्याचा प्रहार
0
SHARES
32
VIEWS

धाराशिव : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार अंतिम टप्यात आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात विकासाबरोबरच वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे.  सहानुभूतीचा कार्ड आता जुनं झालंय. हे कार्ड आता चालणार नाही. कारण घासून ते गुळगुळीत झालं आहे असं म्हणत महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील  यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली.सामान्य  मतदारांना पाटील आणि निंबाळकर कुटुंबातील भाऊबंदकीशी काहीही देणं घेणं नाही. मतदारांना पुढील पाच वर्षात इथे काय विकास होणार आहे हे महत्त्वाचं वाटत असल्याचे पाटील म्हणाल्या.

विद्यमान खासदार व महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आपले वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणी पाटील कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. हिंमत असेल तर दोन महिन्यात फास्टट्रॅक कोर्टामध्ये हत्या प्रकरणाचा निकाल लावावा असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिले होते. त्यानंतर अर्चना पाटील यांनी ओमराजे सहानुभूती कार्ड खेळत असल्याचा आरोप केला. आता तुमचा सहानुभूतीचा कार्ड चालणार नाही असा हल्लाबोल केला आहे.

पवनराजे यांच्या हत्येचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्याबद्दल जास्त बोलणे योग्य नाही. मात्र, पवनराजे हत्या प्रकरणाच्या न्यायालयीन कारवाईत कोणी अडथळे निर्माण केले. प्रकरण महाराष्ट्र बाहेर नेण्यासाठी कोणी प्रयत्न केले आणि त्या दुर्दैवी घटनेचा वापर राजकीय फायद्यासाठी वारंवार कोणी केला असे प्रश्न उपस्थित केले. असा सवाल उपस्थित करत भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही ओमराजेंवर सडकून टीका केली.

पाटील घराण्याच्या 40 वर्षाच्या सत्ता काळात धाराशिवचा विकास झाला नाही असा आरोपही ओमराजे यांनी  केला होता. त्या आरोपाला पाटील दांपत्याने जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. चाळीस वर्षातील पाटील घराण्याच्या सत्ता काळात 25 वर्ष खासदार ओमराजे यांचे वडील पवनराजे हेच पद्मसिंह पाटील यांच्या वतीने कारभार सांभाळत होते. तेव्हा त्यांनी काय घोटाळे केले हे सर्वांना माहीत असल्याचा पलटवार आ. राणाजगजीतसिंह पाटील यांनी केला. जर पाटील कुटुंबाच्या सत्तेच्या काळात धाराशिवमध्ये विकास झाला नसता तर आज भौगोलिक दृष्ट्या सर्वाधिक साखर कारखाने आणि गुळ पावडरचे उद्योग धाराशिवमध्ये राहिले नसत असे राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, माझ्याकडील सोनं आमच्या कुटुंबाची पिढीजात संपत्ती असून ते राजकारणातून कमावलेल नाही. मी पाटलांची सून असून माझ्याकडील सोनं सासर्‍यानी दिलेलं आहे असे सांगत अर्चना पाटील यांनी ओमराजेंनी पाटील घराण्याच्या संपत्ती आणि सोनं संदर्भात केलेल्या आरोपांचा जोरदार समाचार घेतला.

तसेच , सवंग लोकप्रियतेसाठी ओमराजे निंबाळकर रोज शेकडो फोन कॉल घेण्याचा दावा करतात. मग ओमराजे 24 तासाच्या दिवसात 25 तास फक्त फोन कॉलच घेतात का? असं प्रश्न उपस्थित करून पाटील दांपत्यांनी ओमराजे यांच्या फोनद्वारे लोकांच्या संपर्कात राहत असल्याच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे.

Previous Post

आपल्या हक्काचे पाणी आणायचं असेल तर महायुतीच्या अर्चनाताई यांना निवडून द्या-मा.आ. सुजितसिंह ठाकूर

Next Post

कर्मचारी, अधिकाऱ्यांना शिव्या घालून काम करून घ्यायचं हा त्यांचा धंदा-ॲड.धनंजय धाबेकर

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025
Next Post
कर्मचारी, अधिकाऱ्यांना शिव्या घालून काम करून घ्यायचं हा त्यांचा धंदा-ॲड.धनंजय धाबेकर

कर्मचारी, अधिकाऱ्यांना शिव्या घालून काम करून घ्यायचं हा त्यांचा धंदा-ॲड.धनंजय धाबेकर

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483517
Users Today : 48
Users Yesterday : 40
This Month : 1197
Total Users : 30882
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group