राजकीय कट्टा वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांना लोकसभा निवडणुकीवेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी धाराशिव येथे विधान परिषदेवर घेण्याचा शब्द दिला होता.त्यामुळे आता आ.राजेश विटेकर हे विधानसभेवर निवडून आल्यामुळे विधान परिषदेची एक जागा रिक्त झाली आहे.
त्या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या जागी सुरेश बिराजदार यांना संधी मिळेल अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्तुळात चर्चिली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभाजन झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातून प्रथम सुरेश बिराजदार यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता.धाराशिव येथील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुरेश बिराजदार यांना विधान परिषदेवर घेणार असा शब्द त्यांनी दिला होता त्यामुळे आ.राजेश विटेकर यांच्या रिक्त जागी सुरेश बिराजदार यांची वर्णी लागणार का? अशी चर्चा सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यात होत आहे.














Users Today : 19
Users Yesterday : 55
This Month : 1518
Total Users : 26946