महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.प्रताप सरनाईक यांनी सोलापूर ते धाराशिव हा प्रवास बसने करत प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. सोलापूर आगारातून त्यांना बसमध्ये बसवण्यासाठी सोलापूर मध्यचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख हे स्वतः बस स्थानकावर उपस्थित होते.

या प्रवासादरम्यान पालकमंत्र्यांसमवेत माजी आमदार ज्ञानराज चौगुले हे त्यांच्या सोबत एकाच सीटवर बसून त्यांनी प्रवास केला तर तर या प्रवासात युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक,युवा सेना राज्य समन्वयक नितीन लांडगे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे युवा सेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

यावेळी परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी प्रवास पूर्ण होताच बस ड्रायव्हरचा सत्कार करून त्यांना चांगली सेवा देण्याची सूचना दिली.












Users Today : 24
Users Yesterday : 67
This Month : 1816
Total Users : 27244