Tuesday, March 24, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

2019 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्याची ऑफर होती- भाजपचे नितीन काळे यांचा गौप्यस्फोट

Rajkiy Katta by Rajkiy Katta
11 October 2024
in राजकीय
0
2019 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्याची ऑफर होती- भाजपचे नितीन काळे यांचा गौप्यस्फोट
0
SHARES
308
VIEWS

भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांचे वाढदिवसाच्या कार्यक्रमातून जंगी शक्ती प्रदर्शन

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा

2019 च्या विधानसभा निवडणुकी वेळी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कळंब धाराशिव विधानसभा लढण्याची ऑफर देण्यात आली होती असा गौप्यस्फोट भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त बोलताना केला.

भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत धाराशिव येथील परिमल मंगल कार्यालयात जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील हे होते तर या कार्यक्रमास व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संताजी पाटील चालुक्य,भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, बुद्धिजीवी प्रकोष्ठ विभागाचे संयोजक मिलिंद पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड.व्यंकटराव गुंड जिल्हा सरचिटणीस इंद्रजीत देवकते, नगरसेवक व प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रविण पाठक, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.नितीन भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी यांची देखील उपस्थिती होती.

यावेळी ॲड.मिलिंद पाटील यांनी जोरदार ओपनिंग बॅटिंग करताना ज्याच्या हातात कमळ तो आपला माणूस म्हणत नितीन काळे यांना उमेदवारी मिळाली तर मला आनंदच होईल असे सांगितले.त्यासोबतच मला कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पितामह म्हटल्यामुळे मी आता भाजपमधील जेष्ठाच्या लाईन मध्ये जाऊन बसलेलो आहे त्यामुळे आता आमच्या नशिबी काय येतं ते आम्हालाच माहीत नाही असे त्यांनी मिश्किलपणे सांगितले तर भाजपमध्ये कधी कुणाची लॉटरी लागेल याची शाश्वती नाही म्हणून आम्हीही कधी आशावाद सोडत नाहीत अशीही कोपरखळी मारली. 2016 ला नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली तेव्हा नितीन काळे यांनी एक झलक दाखवली आता संधी मिळाली तर ते नक्की सोनं करतील अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.

भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष व भाजपा सहकार विभागाचे मराठवाडा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनीही आपल्या अभ्यासपूर्ण आणि जोरदार वक्तृत्वाच्या जोरावर नितीन काळे यांच्या आठवणींना उजाळा दिला. माझा अपघात झाला त्यावेळी मला पहिलं नाव कोणाचं आठवलं तर ते नितीन काळे यांचे होते असे त्यांनी सांगत सभागृहातील लोक भावनिक केले. नितीन काळे हे वेगळे आंदोलन करण्यात माहीर आहेत असेच एक रेल्वेचे आंदोलन केले,त्या आंदोलनामुळे गोपीनाथ मुंडे यांचा देखील त्यावेळी फोन आला होता व प्रसार माध्यमात देखील त्या आंदोलनाची मोठी दखल घेतली होती.सुजितसिंह ठाकूर हे आमदार असताना कुणाला काय द्यायचं आणि काय टाळायचे हे सर्व नितीन काळे ठरवत होते असाही मिश्किल टोला दिला. माझ्यात आणि नितीन काळे यांच्यात काही विषयावर मतभेद नक्की आहेत पण मनभेद मात्र नाहीत असे सांगताना 2019 च्या विधानसभा निवडणूकीवेळी जर नितीन काळे विधानसभेला उभे राहिले असते तर चित्र वेगळ दिसल असत पण मी त्यांना त्यावेळी बंडखोरी करण्यापासून रोखले असेही त्यांनी सांगितले.काळे कुठलीही संस्था, कारखाना नसताना लोक जोडतात कशी हा अभ्यासाचा विषय असल्याचे सांगत त्यांनी नितीन काळेंना विधानसभेच्या दृष्टिकोनातूनही शुभेच्छा दिल्या.

संताजी चालुक्य यांनी मनोगत व्यक्त करताना राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये जिल्ह्यातील पाच ते सहा नावांची यादी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली असून कोणाचेही त्यामध्ये नाव येऊ शकतं अशी शक्यता व्यक्त केली तर कळंब धाराशिव विधानसभा जागा भाजपला सोडवण्यासाठी मी 100% प्रयत्नशील असून भाजपचे माझ्या कार्यकाळात दोन आमदार हवेत ही इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली. भाजपचा आमदार करायचा असेल तर शासनाने केलेली कामे ही घरोघर पोहोचवली पाहिजेत. कळंब धाराशिव मध्ये इच्छुक उमेदवार कितीही असले तरी जो काम करतो त्याच्या पाठीशी मी उभा असेल असे त्यांनी सांगुन व सर्व इच्छुकांना टांगणीवर ठेवले.

नितीन काळे यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की,मी लोकांसाठी अर्ध्या रात्री येतो हा विश्वास आपण कमावला यापेक्षा जीवनात काहीही कमवायचे नाही. 1994 पासून जो कार्यकर्ता मी जोडला तो आजही सोबत आहे हीच माझी खरी संपत्ती आहे. माझे सहकारी म्हणले म्हणून मी वाढदिवस साजरा करतोय हे शक्ती प्रदर्शन नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. माझ्या मनात कोणतीही लालसा,अपेक्षा नाही पण संधी दिली तर उतणार नाही,मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही असे त्यांनी सांगितले. मला जिथे जिथे काम करण्याची संधी मिळाली तिथे तिथे मी माझ्या कामाची छाप टाकण्याचा प्रयत्न केला.2016साली माजी आणि आ.राणाजगजितसिंह पाटील यांची प्रचाराच्या दरम्यान भेट झाली होती मात्र त्याचवेळी मला जर दादांनी सहकार्य केले असते तर त्यावेळी मी नगराध्यक्ष झालो असतो असेही ते हसत हसत बोलले. येणाऱ्या काळात आ. राणाजगजितसिंह पाटील हे माझ्या पाठीशी मोठ्या भावाप्रमाणे उभा राहतील अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय समारोप करताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नितीन काळे यांना वाढदिवसाच्या निष्कील शुभेच्छा देत त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना केली हे वाक्य उत्तर उच्चारताच लोकांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. हरियाणा निवडणुकीमुळे आपल्याला प्रचंड बळ मिळाले असून महाराष्ट्रात देखील पुन्हा महायुतीचे सरकार येईल त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपले बूथ प्लस ठेवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले मात्र विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत त्यांनी फारसं काही भाष्य केलं नाही.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा धाराशिव पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रदीप शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन संजय मैंदर्गी यांनी केले.

Previous Post

सावंत परिवाराचा अनेक विधानसभा मतदारसंघावर डोळा पण पक्षश्रेष्ठी तर करणार नाही ना कानडोळा?

Next Post

कात्रज पुणे येथील कौटुंबिक स्नेह मेळाव्यात प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांना विकासाच्या मुद्द्यावर आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडून देण्याचा निर्धार

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025
Next Post
कात्रज पुणे येथील कौटुंबिक स्नेह मेळाव्यात प्रा. डॉ. तानाजीराव सावंत  यांना विकासाच्या मुद्द्यावर आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा  निवडून देण्याचा निर्धार

कात्रज पुणे येथील कौटुंबिक स्नेह मेळाव्यात प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांना विकासाच्या मुद्द्यावर आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडून देण्याचा निर्धार

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483561
Users Today : 39
Users Yesterday : 53
This Month : 1241
Total Users : 30926
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group