भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातून अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उद्धव ठाकरे यांनी रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांना उमेदवारी एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे आता भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघात आघाडीचा उमेदवार कोण? हा प्रश्न मिटला असून या मतदारसंघातून रणजित पाटील हे उमेदवार असणार आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची
उमेदवारी घोषित झाल्यानंतर रणजीत पाटील ऐवजी राहुल ज्ञानेश्वर पाटील असा उल्लेख उमेदवारी यादी मध्ये झाला होता. यामुळे धाराशिव जिल्ह्यात गोंधळ माजला होता.आज मात्र या यादीमध्ये करेक्शन करून थेट एबी फॉर्म शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख यांनी रणजीत पाटील यांना एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे आता भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघात कै.ज्ञानेश्वर पाटील यांचे सुपुत्र रणजीत पाटील व विद्यमान पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यात लढत होणार आहे.













Users Today : 5
Users Yesterday : 81
This Month : 1662
Total Users : 27090