Sunday, March 22, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

आ.कैलास पाटील यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवा-उद्धव ठाकरे

Rajkiy Katta by Rajkiy Katta
12 November 2024
in राजकीय
0
आ.कैलास पाटील यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवा-उद्धव ठाकरे
0
SHARES
61
VIEWS


जो व्यक्ती सोन्याच्या लंकेपर्यंत गेलेला असताना, त्यावर लाथ मारत आपली निष्ठा विकली नाही, ज्यान आपल्या धाराशिवच्या नावाला गद्दारीचा कलंक लावला नाही त्या कैलास पाटील यांना खंबीर साथ द्या असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले.


यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की धाराशिवच्या जनतेने लोकसभेला आशीर्वाद दिला. जशी साथ तुम्ही ओमराजेना दिली तीच साथ कैलास पाटील यांना द्यावी. या लोकसभा मतदार संघात असलेल्या सहाही मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून द्यावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. परंडा मतदार संघात ही गद्दारी झाली आहे त्यांना यावेळी हिसका दाखवून द्या असेही आवाहन त्यांनी जनतेला केले.
लोकसभेला आपल्या पक्षाला सात आठ जागा कमी मिळाल्या व देशात सुद्धा अजून वीस पंचवीस ठिकाणी आपले खासदार झाले असते तर मोदी आता हिमालयात गेले असते असा चिमटा त्यांनी काढला. मला हिंदुत्व सोडल म्हणणाऱ्या भाजपने नवाब मलिक आणि अनेक ठिकाणी काय केले यांचाही जाब ठाकरे यांनी भाजपला विचारला.


आमचं सरकार आल्यावर आम्ही जे करणार त्याचा वचन नामा दिला आहे पण महायुती कडून जुमला नामा दिलेला आहे, अडीच वर्ष सत्तेत असताना तुम्हाला या सगळ्या घोषणा प्रत्यक्षात आणता आल्या असत्या पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त थापेबाजी करणारी ही मंडळी आहे, आमचं सरकार स्थापन होताच त्यावेळी कशाचाही विचार न करता एका क्षणात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन शब्द मी पाळला होता. मी शब्द पाळणारा आहे व आताही ज्या गोष्टी देणार असं सांगितलंय ते देऊनच दाखवणार असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. कचऱ्यापेक्षाही कमी किंमत या सरकारने सोयाबीनची केली आहे हे सरकारच कचरा असून त्यांनाच फेकून द्या, आम्ही तुम्हाला हमीभाव पण देऊ व जीवनावश्यक पाच वस्तूचे दर देखील स्थिर ठेवू असे वचन ठाकरे यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना हमीभाव देऊन दाखवला आहे त्यामुळं आताही ते देण्यासाठी सरकार हातात द्या असे आवाहन त्यांनी केले. तसेच सरकारी कर्मचारी यांची जुनी पेन्शन लागू करु तर आशा व अंगणवाडी सेविकाना वाढीव मानधन देऊ असेही आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी ओमराजे म्हणाले ज्या व्यक्तीन आमदार झाल्यावर निष्ठा जपली संकट काळात पक्षाशी इमान राखल त्या माणसाला पुन्हा एकदा विधानसभेत पाठवा. मला या मतदार संघात 61 हजार मताधीक्य दिलंय त्यापेक्षा जास्त मतांनी कैलास पाटील यांना आमदार करावे असे आवाहन ओमराजे यांनी केले.
आमदार कैलास पाटील म्हणाले, ज्या पक्षामूळ व जनतेमूळ मला आमदार होता आलं याची जाणीव माझ्या मनात कायम राहणार आहे. कितीही संकटाचा काळ असू द्या मी पक्षाशी व जनतेशी प्रामाणिक राहीन असा शब्द त्यानी यावेळी दिला. आपण आणलेल्या शहरातील रस्ते तसेच कोट्यावधीचा निधी या सरकारने स्थगिती दिल्यानं खर्च होऊ शकला नाही. या अश्या लोकांनी विकासावर मत मागावे का असा सवाल यावेळी आमदार कैलास पाटील यांनी विरोधकाना केला.

Previous Post

भूम परंडा वाशी मधील एक बडा नेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आज प्रवेश करणार?

Next Post

नात्यागोत्याचे राजकारण विकासाच्या आड येऊ देऊ नका – प्रा. डॉ.तानाजीराव सावंत

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025
Next Post
नात्यागोत्याचे  राजकारण विकासाच्या आड येऊ देऊ नका – प्रा. डॉ.तानाजीराव सावंत

नात्यागोत्याचे राजकारण विकासाच्या आड येऊ देऊ नका - प्रा. डॉ.तानाजीराव सावंत

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483433
Users Today : 4
Users Yesterday : 139
This Month : 1113
Total Users : 30798
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group