परंडा तालुक्यातील लाखी गावातील ओम गायकवाड या विद्यार्थ्याचे घर नुकत्याच झालेल्या पूरामुळे कोसळून कुटुंब उघड्यावर आले आहे. संसार उद्ध्वस्त होऊन शिक्षणासारखी मूलभूत स्वप्ने धोक्यात आली होती.
या कठीण प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) प्रदेश सरचिटणीस मा. डॉ. प्रतापसिंह भैय्यासाहेब पाटील मदतीला धावून आले. त्यांनी पूरग्रस्त कुटुंबाला आवश्यक साहित्य घरपोच करून दिले तसेच विद्यार्थ्याच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वतःवर घेतली.

ओम गायकवाडच्या दहावीनंतरच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत, “हा विद्यार्थी पुढे शिकून मोठा व्हावा, त्याची स्वप्नं पूर्ण व्हावीत, हे माझं कर्तव्य आहे” अशी ग्वाही डॉ. पाटील यांनी दिली.
समाजातील दुर्बल घटकांसाठी आधारस्तंभ ठरणे आणि शिक्षणाला प्राधान्य देणे हेच खरे लोकसेवेचे कार्य असल्याचे पुन्हा एकदा डॉ. भैय्यासाहेब पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
या अगोदरही पिंपळगाव येथील विश्वनाथ दातखिळे यांच्या जवळपास वीस गाई मृत्युमुखी पडल्या होत्या त्या कुटुंबालाही भेट देऊन 51 हजार रुपयांची मदत त्यांनी केली होती तर चिंचपूर येथील सात गाई गेलेल्या अमोल ढगे यांनाही अकरा हजार रुपयांची मदत केलेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने संवेदनशील मनाचे डॉ. प्रतापसिंह पाटील हे संकटकालीन वेळी धावून येणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.













Users Today : 31
Users Yesterday : 55
This Month : 1530
Total Users : 26958