पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र – एच.एस.सी.) परीक्षेचा निकाल सोमवार, ५ मे २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य मंडळाने केली आहे.
राज्य मंडळाचे सचिव श्री. देविदास कुचल्ल यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, यासंदर्भात पत्रकार परिषद देखील सोमवारी सकाळी ११.०० वाजता राज्य मंडळाच्या पुणे येथील मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेसाठी विविध वृत्तवाहिन्या आणि माध्यम प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावर्षी राज्यभरातून लाखो विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली असून, निकालाच्या प्रतीक्षेत विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षक वर्ग देखील आहेत. निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून, विद्यार्थ्यांनी आपला सीट नंबर वापरून निकाल पाहता येईल.
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे:
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in














Users Today : 54
Users Yesterday : 62
This Month : 1498
Total Users : 26926