2022 साली शिवसेना पक्षात मोठं बंड झालं आणि या बंडानंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर २०२४ च्या विधानसभेपर्यंत अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.2024 च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राजकीय वातावरण काहीस थंड झालं आहे असं वाटत असतानाच आता ऑपरेशन टायगरची चर्चा मोठ्या प्रमाणात राज्यात सुरू आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचा एकनिष्ठ शिलेदार म्हणून ज्यांची गेल्या 2022 पासून नवीन ओळख तयार झाली होती असे माजी आमदार राजन साळवी यांनी आपल्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे गटाला लागलेली गळती थांबणार की नाही याची चर्चा सध्या सुरू आहे. राज्यात अनेक खासदार आणि आमदार हे देखील शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या माध्यमांमध्ये होत आहे आणि यालाच ‘ऑपरेशन टायगर’ असे देखील नाव दिल. आहे.
मात्र या ‘ऑपरेशन टायगर’ बद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काहीही बोलताना दिसून येत नाहीत त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ होणार का? या सुद्धा चर्चा सध्या सुरू आहेत. माजी आमदार राजन साळवी हे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला रामराम करण्याची शक्यता असून त्यांनी आपल्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे.
आ.किरण सामंत यांनी राजन साळवी यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता त्यानंतर साळवी कमालीचे अस्वस्थ असल्याचे देखील दिसून येत होते आपल्याच पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून आपल्याला मदत न झाल्याचा त्यांनी आरोप जरी केला नसला तरी देखील तशी भावना त्यांची असल्याचे देखील त्यांचे निकटवर्तीय सांगतात.











Users Today : 94
Users Yesterday : 67
This Month : 1064
Total Users : 30749