Sunday, March 22, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गासाठी ठाकरे सरकारने एक रुपयाही दिला नाही -आ. राणाजगजितसिंह पाटील

Rajkiy Katta by Rajkiy Katta
19 April 2024
in राजकीय
0
0
SHARES
11
VIEWS

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा-

लोकसभा निवडणूक 2024 साठी धाराशिवच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

राणाजगजितसिंह पाटील म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आई भवानीच्या तुळजापूरचा उल्लेख करीत याला मोठे तीर्थक्षेत्र म्हणून आपल्याला विकास करायचा आहे असे सांगितले होते. तसेच तुळजापूर हे रेल्वेच्या नकाशावर आपण निश्चितपणे आणू; एकदा का भाविक इथे येऊ लागले, की इथली अर्थव्यवस्था बदलेल आणि या अर्थकारणाच्या माध्यमातून इथल्या स्थानिक लोकांना प्रचंड चालना मिळेल 2019 मध्ये त्यांनी त्याचं भूमिपूजनही केलं. मात्र त्यानंतर ठाकरे सरकार आलं. त्यांना मी वेळोवेळी विनंती केली की, तुळजापूर – सोलापूर – धाराशिव रेल्वे रेल्वेसाठी 50% केंद्राचा निधी आणि 50% राज्याचा निधी द्यायच ठरलं आहे. केंद्रांनी त्यांच्या बजेटमध्ये तशी तरतूद देखील केलेली आहे मात्र मी वारंवार पाठपुरावा करून देखील ठाकरे सरकारने त्यासाठी एक रुपया देखील दिला नाही.

पुढे बोलताना राणा जगजितसिंह पाटील म्हणाले,  त्यानंतर शिंदे सरकार आलं आणि यासंदर्भात तातडीने निर्णय झाला. या रेल्वेसाठीच टेंडर देखील निघाला असून अर्थमंत्री अजित पवार यांनी यासाठी निधी देखील मंजूर केला आहे. टेंडर प्रक्रिया सुरू झाली असून ते काम आता अंतिम टप्प्यात आहे.  ठाकरे सरकारने यापूर्वीच या कामाला निधी दिला असता तर आतापर्यंत रेल्वे आली असती.

दरम्यान, आपण ‘जय भवानी जय शिवाजी’ असं म्हणतो तर तुळजाभवानी ही आपली कुलस्वामिनी आहे. मी ठाकरे सरकारकडे विनंती केली होती की पर्यटन खात्याकडून या रेल्वेचा आणि तुळजापूरच्या विकासाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा केंद्र त्यासाठी शंभर टक्के अर्थसाहाय्य करेल. पण केवळ या खात्याकडून आदित्य ठाकरे यांनी शिफारस म्हणून प्रस्ताव पाठवला, असे देखील राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

Tags: AjitpawarArchanataipatilOmrajenimbalkar
Previous Post

महायुतीच्या उमेदवार सौ.अर्चनाताई पाटील यांच्या विजयासाठी शिवसैनिक सज्ज; जिल्हाप्रमुख साळुंखे यांचे उपस्थित राहण्याचे आवाहान

Next Post

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनिल चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025
Next Post
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनिल चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनिल चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483433
Users Today : 4
Users Yesterday : 139
This Month : 1113
Total Users : 30798
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group