Sunday, March 22, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

हाती मशाल घेऊन निघालय पण आपण काय बोलतोय त्याचं भान नाही-मा.खा. रविंद्र गायकवाडांनी निंबाळकरांचा घेतला चांगलाच समाचार

Rajkiy Katta by Rajkiy Katta
17 April 2024
in राजकीय
0
हाती मशाल घेऊन निघालय पण आपण काय बोलतोय त्याचं भान नाही-मा.खा. रविंद्र गायकवाडांनी निंबाळकरांचा घेतला चांगलाच समाचार
0
SHARES
21
VIEWS

उमरगा राजकीय कट्टा वृत्तसेवा

धाराशिव लोकसभा मतदारसंघात दोन्ही बाजूने आता जोरदार टिका टिप्पणी सुरू झाली आहे. यातच आमच्या रक्तांमध्ये राष्ट्रवादी, हृदयामध्ये भाजप आणि आमच्या हातामध्ये धनुष्यबाण असल्याचे विधान अर्चना पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांनी केलं होतं. त्यावर आता किडनीमध्ये शिंदे गट टाका, लिव्हरमध्ये मनसे टाका, शरीराच्या सर्व पार्टमध्ये सगळे पक्ष गेले की रात्रीतुन कोणत्याही पक्षात जायला मोकळे असा पलटवार ओमराजे निंबाळकर यांनी केला होता. त्यातच राम मंदिर झाल्यास नोकरी मिळणार का? असा सवालही त्यांनी केला होता. त्यावर आता महायुतीच्या नेत्यांकडून ओमराजे निंबाळकर यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

माजी खासदार रविंद्र गायकवाड यांनी ओमराजे निंबाळकर यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीचा विद्यमान खासदार हातात मशाल घेवून निघाला आहे. मात्र, त्याला त्याच्या पदाचे आणि आपण काय बोलतोय?, याचं भान नाही. अन् त्या मशालीत तेल ओतायचं काम पवार साहेब करीत आहेत. किती पेटेल यांची गॅरंटी नाही, अन् पेटली तर वरून एक बाण गेला तर ती मशाल कधी विझेल हे सांगता येत नाही. असं म्हणत “..अरे तुला माहित आहे का प्रभू श्रीराम म्हणजे काय? रामाचे चारित्र्य काय? रामाचे विचार काय? गल्लीबोळातील पोरासारखं हा लोकसभेचा उमेदवार बोलतोय..” अशी टीका माजी खासदार रविंद्र गायकवाड यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर केली.

पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की, शिवसेना आणि भाजपचा कार्यकर्ता रामशीला घेवून गावोगावी फिरला आहे. राम हे आमचे आराध्य दैवत आहे. राम मंदिराचे महत्व काय हे फक्त आम्हाला माहिती आहे. ते आमच श्रद्धास्थान आहे. यावरच हा देश तरणार आहे. राम मंदिर व्हावे ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत हायस्ट लीड या विधानसभा मतदार संघातून बसवराज पाटील, मी, आ.ज्ञानराज चौगुले, सुरेशदाजी बिराजदार आणि येथील प्रत्येक कार्यकर्ता मिळवून देईल. येथे आपल्याला शंभर टक्के यश मिळणार आहे. त्यामुळे राणा पाटील तुम्हाला काळजी करायची गरज नाही, अशा शब्दांत रविंद्र गायकवाड यांनी विजय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.

Previous Post

अर्चना पाटील यांना औसा, उमरग्यातून १ लाखापेक्षा अधिक मताधिक्य देऊ – सुरेश बिराजदार 

Next Post

महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा जंबो दौरा

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025
Next Post
महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा जंबो दौरा

महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा जंबो दौरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483444
Users Today : 15
Users Yesterday : 139
This Month : 1124
Total Users : 30809
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group