परंडा (राजकीय कट्टा प्रतिनिधी)
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ 10 वी ) बोर्ड परीक्षेचा निकाल आज (27 मे )रोजी ऑनलाईन पद्धतीने लातूर बोर्डातर्फे जाहीर करण्यात आला. परांडा शहरातील संत मीरा पब्लिक स्कूलचा(इंग्रजी माध्यम )निकाल याही वर्षी 100% लागला व सलग 11 वर्षे उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली. यामध्ये कु. अनुष्का अप्पाराव कोलते 98.20%, गुण मिळवत प्रथम, कु. अर्षदिप संतोष भांडवलकर याने 97.20% द्वितीय तर रिषिता नागेश्वर पंडिरीला -96.60% व समीक्षा सुखदेव टोम्पे -96.60% गुण मिळवत शाळेतून तृतीय क्रमांक मिळवला. तसेच शाळेतून 90%च्या पुढे गुण मिळवणारे एकूण 24 विद्यार्थी आहेत. प्रांजल पंकज नांगरे -96.20%, प्रतीक्षा उत्तरेश्वर सुरवसे -95.60%, साक्षी मोहन साळुंखे -95.60%,पायल युवराज साबळे -95.40%, सिद्धी संतोष गोफणे -95.20%,पायल संजय अनभुले -94.80%,अनुजा मनोजसिंह ठाकूर -94.60%, समृद्धी दत्तात्रय सरडे -94.00%, पूर्वा अभय फलफले -93.40%, अथर्व अशोक तळेकर -92.00%, अविष्कार बाळासाहेब झिरपे -91.80%, संस्कृती मंगेश मिसाळ -91.60%, यश कमलाकर चौतमहाल -91.40%, आदित्य अभिजित काळे -91.20%, अथर्व विश्वास जगताप-90.80%, आलीना अतिक काझी -90.60%, सानिका शिवाजी राऊत -90.60%, प्रेम सतीश चौधरी -90.40%, संस्कृती हनुमंत काळे -90.20%, सामर्था संतोष सूर्यवंशी -90.00%,. एकूण 81 विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेस प्रविष्ट झाले होते, त्यापैकी, विशेष प्राविण्य प्राप्त 68 विद्यार्थी, प्रथम श्रेणी प्राप्त 11 तर द्वितीय श्रेणीत 02 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाले आहेत.

शाळेचे संस्थापक डॉ.प्रतापसिंह पाटील,आमदार तथा उपाध्यक्ष डॉ.राहुल पाटील, सचिव डॉ.उदयसिंह पाटील, संस्थेच्या संचालक डॉ.शिल्पा पाटील व प्राचार्य संतोष भांडवलकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक, पालक व कर्मचारी यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.














Users Today : 48
Users Yesterday : 40
This Month : 1197
Total Users : 30882