धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा-
कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प, तुळजापुर तीर्थक्षेत्र विकास कौडगाव,एमआयडीसी अशा असंख्य प्रकल्पांमधून संपुर्ण धाराशिव जिल्हाचा कायापालट करण्यासाठी राणदादा आणि अर्चनाताई अखंड प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच महायुतीच्या उमेदवारालाच मत देऊन प्रंचड मताधिक्याने विजयी करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी उपस्थितांना सांगितले.
त्याआधी मल्हार पाटील धाराशिव मतदारसंघातील बामणी, ताकविकी, तोरंबा, करजखेडा याठिकाणी लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी त्यांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला. यावेळी ते म्हणाले की, राणादादांनी जिल्ह्यात अनेक मोठे प्रकल्प आणले आहे. त्याचा लाभ धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातही अगदी शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचत आहे.. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील हजारो नागरिक घेत आहेत. त्यातून आपले धाराशिव ‘आत्मनिर्भर’ जिल्हा म्हणून पुढे येत आहे.
दरम्यान, निधीचा ओघ आणखी वाढवण्यासाठी आणि गतिमान विकासासाठी महायुतीचा खासदार निवडून देण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. म्हणूनच ‘घड्याळ’ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन या निमित्ताने त्यांनी केले..













Users Today : 30
Users Yesterday : 67
This Month : 1822
Total Users : 27250