Monday, March 23, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

केंद्र सरकारकडून काय काम करून घ्यायचे तेच आपल्या खासदारांना कळले नाही -आ.राणाजगजिसिह पाटील

Rajkiy Katta by Rajkiy Katta
23 April 2024
in राजकीय
0
केंद्र सरकारकडून काय काम करून घ्यायचे तेच आपल्या खासदारांना कळले नाही -आ.राणाजगजिसिह पाटील
0
SHARES
2
VIEWS

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा-

धाराशिव परिसर हा दुष्काळग्रस्त भाग असून शाश्वत पाण्यासह रोजगार निर्मिती हा येथील प्रमुख प्रश्न आहे. केंद्राच्या विचारांचा खासदार आपल्या परिसरातून गेला तर हे प्रश्न सोडवले जाऊ शकतात. त्यामुळे आमचा लढा हा धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आहे,  या भागांचा सर्वांगीण विकासाचे हे स्वप्न पूर्ण होईपर्यंत तो लढा चालूच राहणार, असा निर्धार भाजप नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

औसा येथे महायुती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राणा जगजितसिंह पाटील बोलत होते. याप्रसंगी आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार बसवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना राणा जगजितसिंह पाटील म्हणाले, खासदाराचं काम काय असतं? तर केंद्र सरकारचा मोठा प्रकल्प आपल्या भागात आणणं. केंद्र सरकारच्या निधीतून आपल्या विभागाची विकास काम करून घेणे, काही अडचणीचे विषय केंद्राशी संबंधित असतील तर आपले प्रश्न संसदेत मांडून ते प्रश्न सोडवून घेणे. या तीन पैकी आपल्या मतदारसंघात कुठलं काम विद्यमान खासदारांनी केले आहे? याबाबतीत चर्चा होणे गरजेचे आहे. या भागात आपल्याला एमआयडीसी आणायची आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे शाश्वत पाण्याचा आणि हे पाणी आपल्याला कोण आणून देईल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.  हे आपल्या राज्याचे प्रतिनिधी केंद्र सरकारशी बोलून म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मदतीने आपल्या विभागात शाश्वत पाण्याचा प्रश्न सोडवू शकतात. यासोबतच थोडा पुढचा विचार करू सांगली व कोल्हापूरच्या पुराचं पाणी 100 किलोमीटरच्या बोगदा करून दुष्काळी भाग असलेल्या धाराशिव आणि मराठवाड्याच्या पट्ट्यात शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी आणायचं आहे. म्हणजे एकीकडे शाश्वत पाणी आणि दुसरीकडे उद्योग, रोजगार निर्मिती आणि त्या माध्यमातून आपल्या भागातील अर्थकारणाला चालना देणे हे महत्त्वाचं आहे. हे सगळं नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य होणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले. 

पुढे बोलताना ते म्हणाले,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षात अर्थकारणाबाबत जी रणनीती आखली ज्यामुळे आपली अर्थव्यवस्था आठव्या क्रमांकावरून पाचव्या  क्रमांकावर गेली आहे.  पुढच्या पाच वर्षात आपल्याला आपली देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवायचे आहे.

तसेच अवकाळी पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसान भरपाई बाबाबाद बोलताना पाटील  म्हणाले,   अवकाळी पावसामुळे आपल्या भागात देखील अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. राज्य सरकारने याची दखल घेतली असून तातडीने पंचनामे  करण्याचे आदेश दिले आहेत.  कॅबिनेटने सोयाबीनच्या बाबतीत साडेचार हजार कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

Previous Post

डॉ.पद्मसिंह पाटील यांनी उमरगा-औसा भागात केलेल्या कामामुळे माझा विजय निश्चित-अर्चनाताई पाटील

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहकार्याने आपल्या भागाचे प्रश्न निश्चित सोडवू- आ.राणाजगजितसिंह पाटील

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025
Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहकार्याने आपल्या भागाचे प्रश्न निश्चित सोडवू- आ.राणाजगजितसिंह पाटील

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483517
Users Today : 48
Users Yesterday : 40
This Month : 1197
Total Users : 30882
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group