Thursday, December 18, 2025
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

विद्यमान आमदारांना कोणकोणत्या नेत्यांचे आहे आव्हान,धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात अशा होतील लढती

Rajkiy Katta by Rajkiy Katta
28 July 2024
in राजकीय
0
विद्यमान आमदारांना कोणकोणत्या नेत्यांचे आहे आव्हान,धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात अशा होतील लढती
0
SHARES
2.6k
VIEWS

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा- ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची जंगी तयारी नेत्यांनी सुरू केली असून तिकीट मिळालं तर ठीक अन्यथा जिथून तिकीट मिळेल तिथून लढण्याची तयारी अनेक नेते करत असताना दिसून येत आहेत. कोणता नेता कोणत्या पक्षात कधी जाईल हे निश्चित सांगता येत नाही. कारण जरी पडद्यावर सगळं काही व्यवस्थित दिसत असलं तरी पडद्यामागे मात्र जोरदार राजकीय हालचाली सुरू असल्याचं दिसून येत आहे. सध्या शिवसेना शिंदे गटात भेट घेणा-या लोकांची संख्या जास्त असून थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून अनेक नेते भेटत आहेत.तर आपली जागा कोणत्या पक्षाला जाणार यावर देखील अनेक नेते व कार्यकर्ते गणिते लावत आहेत.

धाराशिव जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपमधील काही नेते पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा आहेत तर ही जागा नेमकी कोणाला सुटणार यावर अनेक जणांनी डोळा ठेवला आहे. ही जागा महाविकास आघाडीच्या घटक पक्षात सध्या काँग्रेस पक्षाला सुटेल अशी चर्चा असली तरी देखील ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाला सुटण्याची शक्यता आहे.विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासाठी ही निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची असून त्यांना काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.धीरज पाटील, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सक्षणाताई सलगर व अशोक जगदाळे तर देवानंद रोचकरी यांनी पक्ष ठरवला नसला तरी देखील ते विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार असल्याचे संकेत आहेत. यापक्षाबाहेरील विरोधकांसह ॲड.व्यंकटराव गुंड,रामदास कोळगे,रोहन देशमुख या पक्षांतर्गत स्पर्धकांचाही सामना करावा लागणार आहे. मुख्यमंत्र्याच्या अत्यंत नजीकचे मानले जाणारे शिवसेना पक्षाचे प्रवक्ते ॲड.योगेश केदार यांनीही तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र ही जागा जर भारतीय जनता पार्टीला सुटली तर महायुतीचा धर्म पाळणार असल्याचे देखील ॲड.योगेश केदार यांनी सांगितले आहे.

उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले हे पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून प्रा.संजय कांबळे,गुजोंटी माजी सरपंच विलास व्हटकर,बच्चू कडुंचे माजी स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी,सामाजिक कार्यकर्ते अशोकराजे सरवदे हे आव्हान उभे करणार असल्याची शक्यता आहे.आहे. काँग्रेसकडून विजय वाघमारे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दिग्विजय शिंदे यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे .महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे राहणार असल्यामुळे दिग्विजय कैलास शिंदे नेमकी काय भूमिका घेतात याकडे देखील सर्वांचे लक्ष आहे.

कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार कैलास घाडगे पाटील हे पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे निश्चित आहे मात्र त्यांच्यासमोर अनेक नावे चर्चेत आहेत महायुतीत ही जागा नेमकी कुणाला सुटणार हे पहिल्यांदा पहावे लागणार आहे.शिवसेना शिंदे गटाकडून युवा सेनेचे राज्य समन्वयक तथा शिवसेनेचे धाराशिव जिल्हा निरीक्षक नितीन लांडगे,शिवसेनेचे संपर्कप्रमुख अनिल खोचरे,शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य विलास पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप मडके,खामसवाडीचे सरपंच अमोल पाटील, धाराशिव शिवसेना तालुकाप्रमुख अजित लाकाळ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र शिंदे गटात धाराशिव येथील दोन मोठे नेते व कळंब तालुक्यातील एक नेता वाटेवर असल्याचे देखील सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे या मतदारसंघातून जर उमेदवारी शिवसेना शिंदे गटाला सुटली तर कुणाला उमेदवारी मिळणार? याच्या देखील चर्चा चवीने ऐकायला मिळत आहेत.भारतीय जनता पार्टी कडून या मतदारसंघातून भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,नितीन काळे,डॉ.सरोजनी राऊत,सुधीर पाटील, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, भाजपाचे कळंब तालुकाध्यक्ष अजित पिंगळे,शिवाजी गिड्डे या नावाची चर्चा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरेश पाटील यांचे नाव चर्चेत आहे. या मतदारसंघात मोठ्या हालचाली होण्याची शक्यता असून येथे पक्षांतराची लाट येण्याची शक्यता आहे.याशिवाय या मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांची देखील भूमिका महत्त्वाची राहणार असून हा मतदारसंघ हा मनोज जरांगे पाटील यांच्या विचारांचा मानला जातो.

भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघ चर्चेतील मतदारसंघातून या ठिकाणी ८१ हजाराचे मताधिक्य खासदार ओमराजे निंबाळकर यांना मिळाल्यापासून या मतदारसंघात विरोधकांनी मोठी मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे मात्र ही देखील जागा कोणत्या पक्षाला सुटणार हे अद्याप निश्चित नाही.या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन पक्षातील नेत्यांमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रयत्न आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून ज्ञानेश्वर पाटील, शंकरराव बोरकर,मेघराज पाटील,डॉ.चेतन बोराडे यांची नावे चर्चेत आहेत तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार राहुल मोटे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. याशिवाय आरोग्यदूत डॉ.राहुल घुले हे देखील सध्या मतदारसंघात जोरदार बांधणी करत असून ते नेमके कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतात याकडे देखील लक्ष लागून राहिलेले आहे.वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण रणबागूल हे देखील निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची शक्यता आहे. याशिवाय मतदारसंघात काही वेगळ्या राजकीय घडामोडी घडल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नवनाथ जगताप यांची उमेदवारीसाठी दावेदारी प्रबळ मानली जाते. या मतदारसंघातून वरील नावाशिवाय प्रशांत चेडे यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे मात्र ते कोणत्या पक्षातून लढणार हे अद्याप निश्चित नाही.भूम परंडा वाशी मतदारसंघात देखील मनोज जरांगे पाटील यांची जोरदार हवा असून ते नेमकी काय भूमिका घेतात यावर या मतदारसंघातील विजयाची गणिते अवलंबून असणार आहेत.या मतदारसंघात बहुरंगी लढतीची शक्यता आहे. ‘अभी नही तो कभी नही’ या भूमिकेत अनेक नेते आहेत.

अशा लढती होण्याची शक्यता?

उमरगा-लोहारा विधानसभा- शिवसेना शिंदे गटविरुद्ध शिवसेना ठाकरे गट

तुळजापूर विधानसभा-भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

कळंब-धाराशिव विधानसभा-शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट

भूम-परंडा-वाशी-विधानसभा
शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट

Tags: AjitpawarBJpNCPOmrajenimbalkar
Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला मोठा धक्का,खा.शरद पवारांनी फोडला अजित पवारांचा एक शिलेदार

Next Post

धाराशिव येथील वर्ग-२ जमिनीचा विषय मार्गी लावण्याचा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला शब्द

Related Posts

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025
“धाराशिवच्या विकासामध्ये राजकारण नको!”-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील
राजकीय

“धाराशिवच्या विकासामध्ये राजकारण नको!”-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील

31 October 2025
धाराशिव जिल्हा युवती सेना प्रमुखपदी श्वेताताई सागर दुरुगकर यांची नियुक्ती
राजकीय

धाराशिव जिल्हा युवती सेना प्रमुखपदी श्वेताताई सागर दुरुगकर यांची नियुक्ती

29 October 2025
हा आनंद म्हणजे शहराच्या प्रगतीच्या विरोधातील मानसिकतेचा पुरावा- भाजप युवा जिल्हाध्यक्ष राहुल काकडे
राजकीय

हा आनंद म्हणजे शहराच्या प्रगतीच्या विरोधातील मानसिकतेचा पुरावा- भाजप युवा जिल्हाध्यक्ष राहुल काकडे

29 October 2025
भाजपा युवा नेते शंतनू पायाळ यांनी आयोजित केलेला नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळावा उत्साहात संपन्न
राजकीय

भाजपा युवा नेते शंतनू पायाळ यांनी आयोजित केलेला नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळावा उत्साहात संपन्न

28 October 2025
Next Post
धाराशिव येथील वर्ग-२ जमिनीचा  विषय मार्गी लावण्याचा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला शब्द

धाराशिव येथील वर्ग-२ जमिनीचा विषय मार्गी लावण्याचा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला शब्द

Recent Posts

  • धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती
  • नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
  • राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज घोषणा होणार!
  • जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कांबळे यांचे राजकारणात पुनरागमन होणार?
  • धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

Recent Comments

No comments to show.

Counter

479565
Users Today : 3
Users Yesterday : 55
This Month : 1502
Total Users : 26930
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group