तुळजापूर / प्रतिनिधी -महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, महिला व बालविकास विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी चैत्र पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरला भेट दिली. त्यांनी कुटुंबीयांसह कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची महापूजा करून कुलधर्म कुलाचार पार पाडले.
यावेळी भारतीय जनता पक्षाच्यावतीने प्रदेश कार्यकारिणी सदस्य गुलचंदभाऊ व्यवहारे यांनी त्यांचा सत्कार केला. पूजेचे पौराहित्य पुजारी सचिन बुबासाहेब पाटील यांनी केले.
राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी मंदिर परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. त्यानंतर मंदिर समितीच्यावतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी माजी मंत्री रामप्रसाद बोर्डीकर, दीपक साकोरे, अमोल यादव, सदानंद दाते, सचिन मुंगसे पाटील, श्रीपाद अंबड आदी उपस्थित होते.
भाजपाच्यावतीने प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे, गुलचंदभाऊ व्यवहारे, विनोद गपाट, सभापती सचिन पाटील, उद्योग आघाडीचे जिल्हा संयोजक राजाभाऊ मलबा समर्थ पैलवान, रोहित चौहान आदी मान्यवरांनी राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांचा सत्कार केला.
यावेळी मंदिर संस्थानचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.












Users Today : 32
Users Yesterday : 67
This Month : 1824
Total Users : 27252