धाराशिव : माझ्या राजकीय जीवनातील पहिले भाषण याच ढोकी गावात झाले आहे. ढोकी गावाच्या विकासाठी माझे विशेष लक्ष राहिलेले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ढोकी गावात मोठ्या प्रमाणात विकासनिधी दिला, यातून ढोकी गावाचा कायापालट झालेला दिसून येतो. यापुढे देखील जिल्हा परिषद, राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी दिलं. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अर्चना पाटील यांनी ढोकी गावात गावकऱ्यांशी सवांद साधला. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत ढोकी गावाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. असे म्हणत त्यासाठी तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महायुतीच्या नेत्यांचे हात बळकट करण्यासाठी घड्याळ चिन्हाला मत द्या. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.दरम्यान, ढोकी गावाने पाटील कुटुंबीयांवर नेहमीच भरभरून प्रेम केलेले आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या राजकीय प्रवासाची सुरूवात देखील ढोकी गावातून झाल्याचे यावेळी अर्चना पाटलांनी सांगितले. यावेळी महायुतीच्या नेत्यांसह गावकऱ्यांचा उदंड प्रतिसाद अर्चना पाटील यांना लाभला.














Users Today : 63
Users Yesterday : 55
This Month : 1562
Total Users : 26990