धाराशिव (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या 58 नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, धाराशिव जिल्हाध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. या पदासाठी जिल्ह्यातून 10 ते 12 इच्छुकांनी दावा केला होता, मात्र पक्षश्रेष्ठींनी कुलकर्णींवर विश्वास ठेवत त्यांना पुन्हा संधी दिली आहे.

नितीन काळे आणि नंतर संताजी चालुक्य पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली होती. मात्र भाजपाच्या राज्यातील सत्ताकाळातही कुलकर्णी यांनी हे पद भूषवलेले होते, त्यामुळे त्यांचा अनुभव आणि कार्यक्षमतेची दखल घेत त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

या नियुक्तीची अधिकृत घोषणा भाजप प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांच्या स्वाक्षरीने करण्यात आली. धाराशिव जिल्ह्याचे भाजप निरीक्षक आमदार रमेश कराड यांनी 1 मे रोजी इच्छुकांशी संवाद साधला होता. त्यानंतर आज प्रदेश कार्यालयातून या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

या निर्णयामध्ये भाजपचे आ.राणाजगजितसिंह पाटील,माजी आमदार सुजितसिंह ठाकूर,माजी आमदार बसवराज पाटील आणि 32 प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सहमतीने ही नियुक्ती झाल्याची माहिती मिळत आहे.













Users Today : 25
Users Yesterday : 67
This Month : 1817
Total Users : 27245