धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा-
भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातून रासपाकडून डॉ.राहुल घुले यांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती आहे.परंडा विधानसभा मतदारसंघातून कालच वंचित बहुजन आघाडीकडून प्रविण रणबागुल यांची उमेदवारी काल जाहीर झाली. त्यानंतर आता डॉ.राहुल घुले यांनी ही परंडा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता परंडा विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढतीची शक्यता आहे. काल रासपाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांची डॉ.राहुल घुले यांनी मुंबई येथे भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली व त्यांनी ही सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाला भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग असून 2004 ला बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांनी 44 हजार मते व 2014 ला 36 हजार मते घेतली होती. तर 2009 ला सूर्यकांत उर्फ सुरेश कांबळे यांनी जवळपास 8500 हजार मते घेतली होती.त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाला मानणारा मोठा वर्ग असून डॉ.राहुल घुले यांना उमेदवारी दिल्यामुळे रासपा या मतदारसंघात टक्कर देणार अशी शक्यता आहे.
मी काल मुंबई येथे रासपाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे व मला त्यांनी निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले आहे. मला उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे त्यामुळे मी आता विधानसभा निवडणूक लढणार आहे.
-डॉ. राहुल घुले












Users Today : 25
Users Yesterday : 77
This Month : 1601
Total Users : 27029