सध्या धाराशिव जिल्ह्यात चर्चेत असलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन योजननेविषयी करजखेडा गावात जावून जगदीश पाटील आणि निम्न तेरणा संघर्ष समिती सदस्यांशी भेट घेवून चर्चा केली . त्यांचा प्रश्न समजून घेतला आणि त्यांचा प्रश्न तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर ठेवून मार्गी काढण्याचे आश्वासन दिले.

मी देखील एक शेतकरी असून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणतो. शेतीला पाणी हा शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा विषय आहे. निम्न तेरणा प्रकल्प पूर्ण झाल्यास हजारो एकर जमिनी ओलिताखाली येतील. या निम्न तेरणा समितीच्या मागणीकडे मी गांभीर्याने पाहत असून लवकरच हा प्रश्न शासनाकडे मांडून तो मार्गी लावणार असल्याचे योगेश केदार यांनी सांगितला.
करजखेडा , पाटोदा , भंडारी , गोगाव , ककासपूर , तोरंबा , ताकविकी , बामणी, बामणीवाडी , बरमगाव , वडाळा , विठ्ठलवाडी , उमरेगव्हाण , पंचगव्हाण , महादेव वाडी, नांदुर्गा , कणगरा, म्हाळंगी, केशेगाव , धुत्ता , कानेगाव , आरणी , उजनी या २३ गावातून गेलेल्या योजनेतून ६८९० हेक्टर शेतीला फायदा होणार आहे .
यावेळी अश्विन पाटील , संतोष पाटील , गौतम क्षीरसागर , कालिदास गायकवाड , गोविंद गरड , सुधीर भोसले , विजयकुमार साळुंखे , शहाजी भोसले , सागर बनकर , तौफिक कमाल इत्यादी शेतकरी उपस्थित होते.












Users Today : 32
Users Yesterday : 67
This Month : 1824
Total Users : 27252