ओबीसी बांधवांच्या हितासाठी छातीचा कोट केल्याशिवाय राहणार नाही
रोहित चंदनशिवे भूम
माझ्या तमाम ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कासाठी व हितासाठी मी छातीचा कोट केल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन प्रा लक्ष्मण हाके यांनी भूम येथील ओबीसी जनजागृती मेळाव्यामध्ये उपस्थित नागरिकांना संबोधित करताना केले.

या ओबीसी जनजागृती मेळाव्याचे आयोजन समस्त ओबीसी बांधवांच्या वतीने करण्यात आले होते.
पुढे बोलताना प्रा. हाके म्हणाले की, सावंत म्हणाले मी मराठा बांधव म्हणून मी जरांगे पाटील यांना भेटायला गेलो आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कधी ओबीसी आरक्षण बाबत संसदेत एक शब्दही बोलले नाहीत. माजी आमदार राहुल मोटे, मंत्री तानाजी सावंत यांनी आपण मदत करूनसुद्धा कधीही कोणत्याही ओबीसी बांधवाच्या आंदोलन, उपोषणास कधीही पाठिंबा दिला नाही. यांना आपण मते देऊन आमदार खासदार केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे आपण सर्वांनी एकत्र येऊन आपणाला शासनकर्ती जमात बनायचे आहे.ओबीसी समाज आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करत आहे. मात्र, लोकप्रतिनिधी यावर व्यक्त होत नाहीत. येणारा आमदार हा ओबीसीचा असायला पाहिजे असे मत व्यक्त केले. तुमच्या आमच्या हक्काची, अधिकाराची ही लढाई असून हक्क मागून नाहीतर रस्त्यावर उतरून युद्ध जिंकून घेयची असतात. महाराष्ट्र मध्ये ओबीसी बांधवांची संख्या बहुसंख्य असून आपण एकत्र येणे गरजेचे आहे. आपले अस्तित्व टिकणे महत्त्वाचे आहे.मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, ओबीसीमधून देऊ नये अशी मागणी लक्ष्मण हाके यांची आहे.

२८८ आमदारांपैकी किती आमदारांनी ओबीसी समाजाच्या प्रश्नावर किती बोललात? हे सांगावे. आज मनोज जरांगे पाटील यांना सर्व आजी-माजी आमदार, खासदार पाठिंबा देत आहेत. पण ओबीसीच्या साठी बसलेल्या उपोषण स्थळी एकही आमदार पाठिंबासाठी का आला नाही अशी विचारणाही लक्ष्मण हाके यांनी केली. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. अशोकराव चव्हाण यांनी दोन ते तीन वेळा भेट घेतली. शरद पवार हे पण भेटले. आताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या चारही मुख्यमंत्र्यांना राज्यात सामाजिकदृष्ट्या मागास, बारा बलुतेदार राहतात याचे थोडेसुद्धा सोयरे सुतक नसावे. हे मंत्री ओबीसीच्या आरक्षणावर बोलायला तयार नाहीत. यांना फक्त जरांगेंच्या मतांची काळजी पडली. पण, ओबीसी बांधवांच्या मतांचे काही पडलेले नाही, अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली.मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, ओबीसीमधून देऊ नये अशी मागणी लक्ष्मण हाके यांची आहे.यावेळी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रवीण रणबागुल आक्रमक…
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण बागुल यांनी उपस्थितांना प्रश्न उपस्थित करत म्हणाले की ज्यांना पिढ्यानपिढ्या तुम्ही मतदान करता परंतु ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात तुमच्या पाठीशी उभारणारा किंवा प्रश्न विचारणारा एकही माय का लाल शिल्लक नाही अशा जहरी शब्दात टीका केली.












Users Today : 32
Users Yesterday : 67
This Month : 1824
Total Users : 27252