धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा-
ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकांमध्ये आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो. पण विकास पुरूष नरेंद्र मोदी यांच्यासाठी आम्ही आता एकत्र आलो आहोत. राज्याचा विकास करायचा असेल तर केंद्रात आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार असले पाहिजे. यापूर्वी तुम्ही अर्चना पाटील यांचे सासरे यांना निवडून दिले होते. आता सुनेची वेळ आली आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांना मतदानाचे आवाहन केले. तसेच ‘सून ही घरातली असते, काही लोक तिला बाहेरची समजतात’, अशा शब्दात शरद पवार यांच्यावर टीका देखील केली.
धाराशिव लोकसभा निवडणुकीतील धाराशिव मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,आमदार पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत,आ.राणाजगजितसिंग पाटील,आ.राजेंद्र राऊत,आ.अभिमन्यू पवार,माजी मंत्री बसवराज पाटील,आमदार विक्रम काळे, मा.आ.सुजितसिंह ठाकूर,सुरेश बिराजदार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली.
अजित पवार म्हणाले, निवडणूक गावकी भावकीची नाही तर इथून पुढच्या पाच वर्षाच्या काळात 140 कोटी जनतेचा नेता निवडण्याची आहे. जसा घरात जसा घरात कारभारी योग्य असेल तर घर चालतं. घरात आर्थिक सुबत्ता, सुख, शांती नांदते. तसंच हा भारत देश आपलं घर आहे. मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे या देशाचा नावलौकिक जगामध्ये वाढवण्याचे काम केलं आज जगात कुठेही गेलं तर भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय आदराचा आणि चांगला असतो. ही कीमया केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळे झालेली आहे. नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक राज्याला भरघोस निधी दिला आहे कोणत्याही राज्यामध्ये जे मोठे मोठे प्रकल्प झाले त्यामध्ये निंमा निम्माहा केंद्राचा असतो आणि निम्मा हा राज्याचा असतो त्यामुळे जे दीडशे दोनशे कोटीचे प्रोजेक्ट प्रत्येक राज्यात झालेले आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीमुळे झाल्याचे दिसते.
पुढे बोलताना पवार म्हणाले, आता नवीन कार्यक्रम त्यांनी दिलेला आहे. तीन कोटी लोकांना घर बांधून देण्याचा. यापूर्वी आदिवासी मागास समाजातील जनतेला घर मिळायची मात्र माझा भटका विमुक्त, अल्पसंख्यांक, मागास वर्गातील गरीब यांना सुद्धा या योजनेअंतर्गत घर मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही काम करतात ते मागचा पुढचा विचार करून करतात. आगामी काळात मोदी सरकार आले तर 300 युनिट पर्यंत ज्यांचा विज बिल येतं त्यांना वीज मोफत दिली जाणार आहे, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.














Users Today : 53
Users Yesterday : 55
This Month : 1552
Total Users : 26980