धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा-
श्री सिध्दीविनायक परिवाराची उद्योग निष्ठा महाराष्ट्राला आदर्शवत असल्याचे प्रतिपादन प्रख्यात कवी श्री.इंद्रजित भालेराव यांनी श्री सिध्दीविनायक परिवाराच्या स्नेहमेळाव्यात केले.

धाराशिव जिल्ह्यात नावलौकिकाचा ठसा उमटविणाऱ्या श्री सिध्दीविनायक परिवारातील कौटुंबिक सहकाऱ्यांचा शनिवारी २५ मे रोजी परिमल मंगल कार्यालय येथे स्नेहमेळावा पार पडला. यावेळी श्री सिध्दीविनायक परिवारातील बँकिंग, गूळ कारखाना, इन्शुरन्स तसेच शेती संबधित क्षेत्रात काम करणारे जिल्ह्यातील सर्व सहकारी सपरिवार उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मातोश्री श्रीमती मीनाताई कुलकर्णी तर प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात साहित्यिक कवी श्री. इंद्रजित भालेराव यांची उपस्थिती होती. यावेळी श्री.इंद्रजित भालेराव यांनी कवितेच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचे उदाहरण देत दत्ता कुलकर्णी हे खूप चांगल्या पद्धतीने राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात उत्तम काम करत आहेत असे गौरव उद्गार काढले. राजकारण करत करत निष्ठेने उद्योग करायला हवं हे आपल्याकडून शिकण्यासारखं आहे. असे म्हणत मी आपले काम पाहतात असताना स्वर्गीय श्री.गणपतराव देशमुख यांची आठवण झाली त्यांनी एकामागून एक उद्योग उभा करत महाराष्ट्रात एक मॉडेल उभा केले होते. जिथे कापूस पिकत नाही अश्या सांगोला येथे सुतगिरणी उभा केली तसेच यातून मिळालेल्या नफ्यातून त्यांनी महिलांच्या हाताला काम मिळवून दिले. आपल्या समाजावर कशी निष्ठा असावी हे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्याकडून शिकलं पाहिजे त्यांनी जसे उद्योग सुरू केले व चालवले त्यांचेच प्रतिबिंब दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्यात पाहायला मिळाले असेही म्हणाले.

यावेळी श्री इंद्रजित भालेराव यांनी “लढ पोरा लढायला शिक, शेतकरी बाप, यासह गाऊ जिजाऊस आम्ही या कवितासंग्रहातील त्यांच्या बालपणावरील कविता, माय लेकीची कविता म्हणत त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध तर केले. या कार्यक्रमास श्री.एम.डी. देशमुख सर, ॲड.श्री. राम काका गरड, श्री.रवि केसकर, श्री.योगेश कुलकर्णी, ॲड.नितीन भोसले, ॲड. प्रतीक देवळे, श्री. दिनेश कुलकर्णी, श्री.बालाजी कोरे, श्री. बालाजी चव्हाण, श्री संतोष जहागीरदार, श्री.गणेश कामटे, श्री.राजेश जाधव, श्री.देविदास कुलकर्णी, श्री.अरविंद गोरे, श्री. रामभाऊ सरडे व सर्व सहकारी व महिला माता भगिनी, कुटुंबीय उपस्थित होते.












Users Today : 32
Users Yesterday : 67
This Month : 1824
Total Users : 27252