राजकीय कट्टा वृत्तसेवा –
अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे आता त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर नेमकी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा दिवसभर माध्यमांमध्ये होती.यामध्ये प्रामुख्याने तीन नावाची चर्चा पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत असून यामध्ये जर बीड जिल्ह्यात मंत्री पद द्यायचे झाले तर या जिल्ह्यातून गेवराई विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आ.विजयसिंह पंडित यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते किंवा मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर परभणीचे आमदार राजेश विटेकर या दोघां युवा आमदारांपैकी एका आमदाराला संधी मिळू शकते. जातीय समीकरणाचा विचार करून जर मंत्रिमंडळात स्थान द्यायचे झाले तर सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघाचे आमदार ऍड मनोज कायंदे या नावाचा विचार होऊ शकतो अशी देखील चर्चा आहे.

याशिवाय मागील मंत्रिमंडळातून गच्छंती झालेल्या छगन भुजबळ,अनिल पाटील,संजय बनसोडे यांच्यापैकीही कुठल्या ही नावावर ऐनवेळी शिक्कामोर्तब होणार का? याकडे देखील लक्ष लागून राहिले आहे.

एक मात्र निश्चित धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीतील इच्छुक आमदारांना एक आशेचा किरण निर्माण झाला असून आठ ते दहा आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचे हा सर्वस्वी निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार हेच घेणार आहेत.मात्र तरीही या मंत्रिमंडळात युवा चेहऱ्याला संधी द्यायची झाल्यास गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित शिंदखेडा राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे व पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता आमदार राजेश विटेकर या तीन नावांची चर्चा प्रामुख्याने होणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या तिघांनाही जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील अनुभव असल्यामुळे मंत्रीपदाची लॉटरी कुणाला लागणार याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे…














Users Today : 25
Users Yesterday : 67
This Month : 1817
Total Users : 27245