कळंब येथे हजरत पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त दयावान प्रतिष्ठानतर्फे आयोजित ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळ्यात एक हृदयस्पर्शी क्षण पाहायला मिळाला. कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील आणि सलग दोन वेळा २०१९ व २०२४ ला त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार अजित पिंगळे हे एकाच गाडीत बसून ॲम्बुलन्सची सफर करताना दिसले.

लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर अजित दादांनी ड्रायव्हिंग सीट पकडली, तर सहचालकाच्या सीटवर आमदार कैलास घाडगे पाटील बसले. मागील सीट रिकामी असूनही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांनी गाडीत न बसण्याचा निर्णय घेतला. या प्रसंगाचे साक्षीदार असलेल्या राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

ही घटना केवळ एक साधी सफर नव्हती, तर “निवडणुकीतील स्पर्धा संपल्यानंतर विकासासाठी एकत्र काम करणे गरजेचे आहे” हा सकारात्मक संदेश देणारा क्षण होता. ग्रामपंचायत सदस्य इमरान मुल्ला यांनी हा योग साधून दिला. विविध पक्षांचे मान्यवर व पदाधिकारी या ऐतिहासिक क्षणाला उपस्थित होते.












Users Today : 22
Users Yesterday : 67
This Month : 1814
Total Users : 27242