भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघाच्या रोमहर्षक लढतीत शिवसेनेचे डॉ.तानाजी सावंत यांनी १५०९ मतांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल मोटे यांचा पराभव केला आहे. डॉ.तानाजी सावंत यांनी हा विजय काठावरचा मिळवला असला तरी देखील या विजयाच्या विश्लेषणामध्ये डॉ.सावंत यांना भूम व परंडा तालुक्यातील ग्रामीण भागातून पिछाडी असून भूम परंडा दोन्ही शहराने कमी पण निर्णायक आघाडी दिली आहे. त्यामुळेच सावंत यांचा विजय होऊ शकला मात्र या विजयात खरा वाटा हा वाशी तालुक्याचा असल्याचे देखील आकडेवारीवरून लक्षात येत आहे. वाशी तालुक्यामध्ये केशव सावंत यांनी स्वतः यंत्रणा ताब्यात घेऊन या ठिकाणी कार्यकर्त्यांना सर्व प्रकारची यंत्रणा पुरवल्यामुळे इथून डॉ.तानाजी सावंत यांना वाशी तालुक्यातून ३५२२ मतांची निर्णायक आवश्यक असणारी आघाडी मिळाली व त्या बळावरच ते विजयापर्यंत देखील पोहोचल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
भूम तालुक्यातून राहुल मोटे यांना ३५,९६७ एवढी मतं मिळाली तर डॉ.तानाजी सावंत यांना ३५,६३०एवढी मतं मिळाली भूम तालुक्यातून राहुल मोटे यांना ३३७ मतांची आघाडी मिळाली मात्र भूम शहरातून सावंत यांना ३०५ मतांची आघाडी मिळाली आहे. भूम शहरात डॉ.तानाजी सावंत यांना ५,३७६ तर राहुल मोटे यांना ५०७१ एवढी मतं मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण रणबागुल यांनी देखील भूम तालुक्यातून ६४३१ एवढी मतं मिळाली.
डॉ.तानाजी सावंत यांना ३८,४३८ व राहुल मोठे यांना ३९,७५८ एवढी मतं मिळाली.परंडा तालुक्यातुन राहुल मोटे यांना १३२० मतांची आघाडी मिळाली आहे. मात्र परंडा शहरातून डॉ.तानाजी सावंत हे १२६० मतांनी आघाडीवर आहेत. परंडा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण रणबागुल यांना ३०९३ एवढी मते मिळाली.
वाशी तालुका हा डॉ. तानाजी सावंत यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा विजयासाठी तारणहार ठरला असून तालुक्यातून डॉ. तानाजी सावंत यांना २८,१२७ एवढी मते मिळाली तर राहुल मोटे यांना २४,६०५ एवढी मते मिळाली. वाशी तालुक्यातून डॉ.तानाजी सावंत यांना ३५२२ निर्णायक आघाडी मिळाल्यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाला त्यासोबतच वाशी शहरातून देखील डॉ. तानाजी सावंत यांना २१७ मतांची आघाडी मिळाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. तर वाशी तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण रणबागुल यांना ३००४ एवढी मते मिळाली.
पोस्टल मतातही राहुल मोटे आघाडीवर होते त्यांना १४१५ एवढी मते मिळाली तर डॉ.तानाजी सावंत यांना १०५९ एवढी मते तर प्रवीण रणबागुल यांना १७० मते मिळाली आहेत. त्यामुळे पोस्टल मतात राहुल मोटे हे ३५६ मतांनी आघाडीवर होते.
एकूण मतात शिवसेनेचे डॉ.तानाजी सावंत यांना १,०३,२५४, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल मोटे यांना १,०१७४५ वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण रणबागुल यांना १२,६९८, राष्ट्रीय समाज पक्षाचे डॉ. राहुल भीमराव घुले यांना २१७० तर अपक्ष जमीलखा मेहबूब पठाण यांना ट्रंपेट या चिन्हावर ४४४६ एवढी मत मिळाली आहेत इतर उमेदवारांनी चार अंकी मतांचा आकडा देखील गाठलेला नाही.











Users Today : 35
Users Yesterday : 81
This Month : 1692
Total Users : 27120