इथला तरूण जागा झालाय, इतकी वर्षे त्यांच्या बापाला फसवलं तसं आता तरूणांना फसवणं सोपं नाही…
विरोधकांवर टीकास्त्र विझोरा येथील घोंगडी बैठकीला परिसरातील गावांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विझोरा – येथील युवक जागा झाला आहे, वीस वर्षे आमच्या बापाला फसवलं, आता आम्ही फसणार नाही, असे हे युवक म्हणत आहेत. ही लढाई फक्त विजयाची नाही तर, ही लढाई विकासासाठीची आहे, या भागाला नामदार बनविणारी आहे. माझा शेतकरी सायकल, बैलगाडीतून जात होता. आता तो स्वतःच्या फोर व्हिलरमधून गेला पाहिजे, म्हणून माझ्या शेतकर्याचे भले करण्यासाठी नुसतेच निवडून नाही तर एक लाखाच्या लीडने निवडून द्या, असे आवाहन महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी विझोरा येथे आयोजित घोंगडी बैठकीत केले. या बैठकीला सरमकुंडी, शेलगाव, दहीफळ, विझोरा, बनगरवाडी, घाटपिंपरी, यसवंडी आदी गावांतील महिला, पुरूष यांच्यासह तरूणवर्ग व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा. डॉ. तानाजीराव सावंत म्हणाले, की भूम, परांडा, वाशी या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात विकास करण्यात यशस्वी झालो असलो तरी, मी अजून समाधानी नाही. मला १०० टक्के विकास करायचा आहे. मागील लोकप्रतिनिधीची मानसिकता ही निजामाप्रमाणे होती, म्हणून त्यांनी या भागाला विकासापासून वंचित ठेवले. विकासाची ही उणिव भरून काढण्यासाठी आपल्याला निवडून यायचे आहे. आपल्या महायुतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, त्यात येत्या काळात आपल्याला शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी करायची आहे. लाडक्या बहिणीचे १५०० रूपयांवरून २१०० रूपये करायचे आहेत, शेतकरी, गोरगरिब यांच्याहितासाठी काम करणारे आपले महायुतीचे सरकार आहे. या भागाचा विकास करताना जेथे शासकीय योजनांतून कामं होतील तेथे शासकीय योजना राबविल्या, आणि जेथे योजनांत कामे बसत नाहीत, तेथे भैरवनाथ शुगर्सच्या माध्यमातून, स्वखर्चातून कामं करून या भागातील नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले. शेतकर्यांना शेतरस्ते दिले, पिण्याच्या पाण्याचे टँकर दिले, जे करता येईल ते सर्व केले. विरोधकांना काहीच करता आले नाही म्हणून ते निरर्थक टीका करत आहेत, त्यांच्याकडून त्यांच्या १५ वर्षाचा लेखाजोखा घ्यावा लागेल. कारण, जो काही विकास झाला तो फक्त अडीच वर्षातच झालेला आहे. आपण गावागावांत स्मशानभूमी उभारली, कब्रस्थानांनाही निधी दिला. परंतु, ते स्वतःच्या गावात स्मशानभूमी उभारू शकले नाहीत. त्यांच्या गावात स्मशानभूमी ही आपण दिली. गेली १५ वर्षे ते महिलांना हळदी-कुंकवावर खूश करत होते, महिलांसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणून त्यांना आर्थिक हातभार लावला. आता राजपुत्र (राहुल गांधी) म्हणतो आम्ही तीन हजार देऊ, मग आधी या योजनेला विरोध का केला? असा सवालही प्रा. डॉ. सावंत यांनी केला. महाआघाडीवाले आता म्हणत आहेत, की आमचे सरकार आल्यावर मोफत उपचार देऊ, पण आम्ही तर १५ ऑगस्ट २०२३ पासूनच सर्वांसाठी मोफत उपचार सुरू केले आहेत, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

या घोंगडी सभेला शिवसेना जिल्हा युवासेना प्रमुख बाळासाहेब नागरे, शिवसेना तालुका प्रमुख सत्यवान गपाट, तालुका संघटक शिवहार स्वामी, गटनेते नागनाथ नाईकवाडे, बंडू खोसे, विकास तळेकर, महिला आघाडी प्रमुख पूजा उकिरडे, ललिता जगताप, सरपंच मिनाक्षी खोसे, उपसरपंच आमोल खोसे, अनिल खोसे, राजेभाऊ सावंत, महादेव क्षेत्रीय आदींसह बहुसंख्य महिला, पुरूष व तरूणांची उपस्थिती होती.प्रा. डॉ. तानाजीराव सावंत म्हणाले, की भूम, परांडा, वाशी या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात विकास करण्यात यशस्वी झालो असलो तरी, मी अजून समाधानी नाही. मला १०० टक्के विकास करायचा आहे. मागील लोकप्रतिनिधीची मानसिकता ही निजामाप्रमाणे होती, म्हणून त्यांनी या भागाला विकासापासून वंचित ठेवले. विकासाची ही उणिव भरून काढण्यासाठी आपल्याला निवडून यायचे आहे. आपल्या महायुतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, त्यात येत्या काळात आपल्याला शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी करायची आहे. लाडक्या बहिणीचे १५०० रूपयांवरून २१०० रूपये करायचे आहेत, शेतकरी, गोरगरिब यांच्याहितासाठी काम करणारे आपले महायुतीचे सरकार आहे. या भागाचा विकास करताना जेथे शासकीय योजनांतून कामं होतील तेथे शासकीय योजना राबविल्या, आणि जेथे योजनांत कामे बसत नाहीत, तेथे भैरवनाथ शुगर्सच्या माध्यमातून, स्वखर्चातून कामं करून या भागातील नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले. शेतकर्यांना शेतरस्ते दिले, पिण्याच्या पाण्याचे टँकर दिले, जे करता येईल ते सर्व केले. विरोधकांना काहीच करता आले नाही म्हणून ते निरर्थक टीका करत आहेत, त्यांच्याकडून त्यांच्या १५ वर्षाचा लेखाजोखा घ्यावा लागेल. कारण, जो काही विकास झाला तो फक्त अडीच वर्षातच झालेला आहे. आपण गावागावांत स्मशानभूमी उभारली, कब्रस्थानांनाही निधी दिला. परंतु, ते स्वतःच्या गावात स्मशानभूमी उभारू शकले नाहीत. त्यांच्या गावात स्मशानभूमी ही आपण दिली. गेली १५ वर्षे ते महिलांना हळदी-कुंकवावर खूश करत होते, महिलांसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणून त्यांना आर्थिक हातभार लावला. आता राजपुत्र (राहुल गांधी) म्हणतो आम्ही तीन हजार देऊ, मग आधी या योजनेला विरोध का केला? असा सवालही प्रा. डॉ. सावंत यांनी केला. महाआघाडीवाले आता म्हणत आहेत, की आमचे सरकार आल्यावर मोफत उपचार देऊ, पण आम्ही तर १५ ऑगस्ट २०२३ पासूनच सर्वांसाठी मोफत उपचार सुरू केले आहेत, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.













Users Today : 30
Users Yesterday : 67
This Month : 1822
Total Users : 27250