मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काल धाराशिव दौरा झाला. या दौऱ्यामध्ये अनेक भावी आमदारांमध्ये चलबिचल, वर्चस्व दाखवण्याची प्रवृत्ती, होर्डिंग द्वारे शक्तिप्रदर्शन आणि धावपळ दिसून आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणाला ही नाराज न करता अनेकांना त्यांच्या पद्धतीने केवळ कामाला लावले मात्र कुणालाही शब्द दिला नाही अशी माहिती मिळाली आहे.यामध्ये अनेक गमतीच्या गोष्टी देखील घडल्या.परंडा येथील मेळाव्यात कळंबचे माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे यांचा शिवसेनेत प्रवेश घेतला.ते इच्छुकांमध्ये अग्रस्थानी आहेत. काही दिवसापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केलेले सुधीर पाटील यांच्या मेळाव्याला उपस्थिती लावली. तत्पूर्वी मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यात नसतानाही शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांच्या कार्यालयाला मुख्यमंत्र्यांनी धावती भेट दिली.तसेच मेळाव्याचे ठिकाण ते विमानतळ या प्रवासादरम्यान ‘साळुंके गाडीत बस’ असा आवाज देत त्यांनाही नाराज न करता त्यांनाही काही वेळ दिला. आणखी एक प्रमुख इच्छुक आणि मुख्यमंत्री यांची जवळचे मानले जाणारे नितीन लांडगे हे काहीसे दूर आहेत असं वाटत असतानाच विमानतळावर ‘अरे नितीन तुला यायचं नाही का? असं म्हणत नितीन लांडगे यांना हेलिकॅप्टरमध्ये बसवून घेऊन गेले. त्यामुळे शिवसेना पक्षातील जे इच्छुक आहेत त्या इच्छुकांना त्यांनी त्यांच्या पद्धतीने कामाला लावत या दौऱ्यात सर्वच भावी आमदारांना एनर्जी देण्याचे काम केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
मेळाव्याच्या ठिकाणी कळंबचे माजी उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी देखील मी गेल्या 30 वर्षापासून सातत्याने सामाजिक कार्यात आहे व मला कळंब -धाराशिव विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.त्यांना देखील आपण मुंबईला येऊन भेटा असा त्यांनी निरोप दिल्याची माहिती आहे.
त्यामुळे कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघातील जे इच्छुक आहेत त्या इच्छुकांना पुन्हा जोरदारपणे कामाला लावण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत कुणालाही ठोस शब्द आश्वासन न देता आपण काम करत राहा एवढा शब्द दिल्याची माहिती आहे.













Users Today : 47
Users Yesterday : 77
This Month : 1623
Total Users : 27051