उस्मानाबाद : तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (रायगड) येथे कार्यकारी परिषद सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. या नियुक्ती बद्दल आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी आयोजित सत्कार कार्यक्रमात प्राचार्य डॉ. माने यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. नितीन काळे, नेताजी पाटील, पांडुरंग लाटे, प्रशासकीय समन्वयक गणेश भातलवंडे, डॉ. दिगंबर दाते, डॉ.उषा वडणे, डॉ.प्रीती माने, डॉ.गुरुप्रसाद चिवटे, प्रा.शितल पवार, प्रा.प्रदीप पवार, प्रा. ज्ञानराज निंबाळकर, डॉ.राजेश नन्नवरे, डॉ. राजश्री यादव, प्रा. रफिक शेख, श्री. आर. एल. मुंडे आदींची उपस्थिती होती.
डॉ. माने यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत ही महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आजवर शिक्षण, संशोधन आणि संस्था विकासाच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे ही जबाबदारी मिळाली असून, यामुळे तेरणा संस्थेच्या शैक्षणिक प्रतिमेत अधिक भर पडली आहे.
त्यांच्या पुढील कार्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या असून, या नियुक्तीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.












Users Today : 29
Users Yesterday : 67
This Month : 1821
Total Users : 27249