कळंब (ता. प्रतिनिधी) – कळंब तालुक्यातील एकूण 92 ग्रामपंचायतींमधील सरपंच पदासाठी सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी आरक्षण प्रक्रिया पारदर्शकतेने आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी महत्त्वाची बैठक 16 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस मा. उपविभागीय अधिकारी, कळंब यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे तालुका अध्यक्ष आमंत्रित करण्यात आले आहेत. भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार व अजित पवार गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन समाज पार्टी, एमआयएम, आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांचे तालुका अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
तहसीलदार कळंब यांनी ही माहिती दिली असून, ग्रामपंचायतीच्या लोकशाही प्रक्रियेत सर्वपक्षीय सहभाग आणि पारदर्शकता राखण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.












Users Today : 32
Users Yesterday : 67
This Month : 1824
Total Users : 27252