महाविद्यालयाचा सरासरी निकाल ९८% – गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
कळंब प्रतिनिधी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत मार्च-एप्रिल 2025 मध्ये घेण्यात आलेल्या पदवी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, रांजणी येथील साई कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी यंदाही घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा एकूण सरासरी निकाल ९८% लागला असून, अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत गुणवत्तेचा दर्जा उंचावला आहे.
🖥️ बीसीएस (तृतीय वर्ष) यशवंत विद्यार्थी
🥇 वैष्णवी नवनाथ घटमल (शिराढोण) – 87.90%
🥈 आकांक्षा अंगद साळुंके (घारगाव) – 87.50%
🥉 साक्षी आदमाने (रांजणी) – 87.30%
💻 बीसीए (तृतीय वर्ष) यशवंत विद्यार्थी
🥇 कादंबरी रामभाऊ ढवारे (ठाणे) – 78.10%
🥈 साक्षी बुबासाहेब देशमुख (अंजनपूर कोपरा) – 78.00%
🥉 नांगरे प्रतिभा शिवाजी (जायफळ) – 76.90%
या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे, सचिव ए. बी. ठोंबरे, उपाध्यक्ष डी. आर. काळदाते, समन्वयक बी. के. भातलवंडे, कृषिभूषण पी. एस. आवाड, डॉ. ए. बी. जगताप, प्र. प्राचार्य जे. सी. गवळी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच प्रा. एन. एम. चाऊस, प्रा. एम. के. साबळे, प्रा. ए. डी. जाधव, प्रा. पी. जी. मोरे, एस. आय. शिंदे, डी. एल. शेळके, एस. एच. शेख आणि बी. डी. लांडगे या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या यशात योगदान देण्याचा आनंद व्यक्त केला आहे.