हिंगोली, १६ एप्रिल: राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, त्यानुसार २०१७ बॅचचे आयएएस अधिकारी राहुल गुप्ता यांची हिंगोली जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल)चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्य पाहिले असून, त्याआधी धाराशिव जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.

राहुल गुप्ता यांनी आयआयटी रोपार, पंजाब येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. त्यांच्या पूर्वीच्या प्रशासकीय कारकिर्दीत त्यांनी गडचिरोली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, धाराशिव जिल्हा परिषदचे सीईओ तसेच एमएसईडीसीएलचे संचालक म्हणून प्रभावीपणे कार्य केले आहे. धाराशिव जिल्ह्यातील त्यांचे कार्य विशेष नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे राज्यपातळीवर गौरवले गेले होते.
हिंगोलीचे माजी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी गुप्ता यांची वर्णी लागल्याने जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल राज्यभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.












Users Today : 64
Users Yesterday : 55
This Month : 1563
Total Users : 26991