श्री लक्ष्मी सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा डॉ.सौ.सरोजिनीताई राऊत यांचे यशस्वी आयोजन
भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हा व श्री. लक्ष्मी सेवाभावी संस्था हासेगाव(शि.) ता. कळंब जि.धाराशिव यांच्या संयुक्त विद्यामान आपला आदर्श .. आपली प्रेरणा नवं भारत निर्माण संकल्पक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या १० वर्षांच्या कारकिर्दीवर आधारीत लोकशाहीचा चौथा स्तंभ महाराष्ट्रातील नामांकित मराठी वृत्तपत्रातील छायाचित्र व माहीतीच ” पंतप्रधान ते प्रधानसेवक”नरेंद्र मोदी प्रदर्शन स्वस्तिक मंगल कार्यालय जिजाऊ चौक बार्शी नाका धाराशिव बुधवार दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११. ३० वाजता उद्घाटन भारत सरकारचे माजी केंद्रीय मंत्री मा.खा.रावसाहेब दानवे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी आ.राणाजगजितसिंह पाटील, विधानपरिषद मा.आ.सुजितसिंह ठाकुर, भाजपा धाराशिव जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मिलिंद पाटील,माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे बुद्धिजीवी प्रकोष्ट विभागाचे संयोजक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हे वृत्तपत्र कात्रण प्रदर्शन यशस्वीरित्या पार पडले.

प्रदर्शनाचे स्वागताध्यक्ष श्री. लक्ष्मी सेवाभावी संस्था हासेगाव ( शि.) ता. कळंब जि.धाराशिव अध्यक्षा डॉ.सौ. सरोजनीताई संतोष राऊत होत्या. प्रदर्शनाचे संयोजन श्री.नितीन चिलवंत व सौ.रेश्मा नितीन चिलवंत यांनी केले. समन्वयक म्हणुन नानासाहेब पाटील व किशोर तिवारी रजपुत यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंकुश चिकने व सर्व भाजपा कार्यकर्ता यांनी यांनी परिश्रम घेतले.
भारतीय जनता पार्टी जिल्हास्तरीय अधिवेशन धाराशिव जिल्हयातील भाजपाचे आजी माजी पदाधिकारी , विद्यमान पदाधिकारी ,आमदार ,माजी आमदार ,लोकसभा व विधानसभा निवडणुक लढलेले उमेदवार ,प्रदेश पदाधिकारी ,प्रदेश कार्यकारीणी सदस्य ,आघाड्या ,प्रकोष्ट ,मोर्चे जिल्हा ,तालुकाध्यक्ष ,महामंत्री ,तालुका पदाधिकारी ,नगराध्यक्ष ,माजी नगराध्यक्ष ,नगरसेवक ,माजी नगरसेवक ,सरपंच ,चेअरमन , सहकारी बँकेचे संचालक ,शिक्षण संस्था संचालक यांच्यासह उपस्थित सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी पंतप्रधान ते प्रधानसेवक नरेन्द्र मोदी प्रदर्शनास भेट दिली.

आपल्या भारत देशात २८ राज्य व ८ केंद्रशासित प्रदेश आहेत त्याच बरोबर भारत सरकारचे एक मंत्रालय आहे. आपल्या देशात ७५ वर्षात १४ वा पंतप्रधान झाले पण आज पर्यंत कुठल्या ही मंत्रालयामध्ये देशाच्या पंतप्रधानाचे लोकशाहीचा चौथा स्तंभ वृत्तपत्रातील छायाचित्र व माहीतीच प्रदर्शन भरविण्यात आलेले नाही.
तो पहिला मान महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयास मिळाला आहे हे अभिमानानं सांगावास वाटत.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शुभ आशिर्वादान धाराशिव जिल्हयातील भाजपा जिल्हा उपाध्यक्षा डॉ.सौ.सरोजनीताई संतोष राऊत यांच्या पुढाकाराने मराठवाड्यात खुप चांगली संकल्पना राबविली यामुळे त्यांच्या सर्वांनीच मना पासुन कौतुक केले.

भारत सरकारचे माजी रेल्वे राज्यमंत्री मा. खा. श्री. रावसाहेब दानवे पाटील यांनी प्रदर्शनाचे उद् घाटन समारंभात बोलताना सांगितले की,आपल्या देशाचे कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षांच्या कारकिर्दीवर आधारीत मराठी नामांकीत वृत्तपत्रातील छायाचित्र व माहीतीचे ” पंतप्रधान ते प्रधानसेवक” नरेंन्द्र मोदी प्रदर्शनाचे न्युज फोटोबायोग्राफी बुक प्रकाशित करुन पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर २०२४ रोजीच्या ७४ व्या वाढदिवसा निमित्त आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी ,आमदार ,खासदार व कार्यकर्ता यांना वाटप करावे जेणे करून आपल्या भाजप सरकार विरोधात जो सामान्य जनतेत निगेटीव्ह नेरीटीव्ह सेट केला आहे त्याला सकारात्मक उत्तर यातुन समाजापुढे ठेवता येणार आहे.
आभार प्रदर्शन स्वागताध्यक्ष डॉ.सौ. सरोजनीताई संतोष राऊत यांनी केले. प्रदर्शनाचे संकल्पक व संकलक नितीन चिलवंत व सौ.रेश्मा नितीन चिलवंत यांचा सन्मान माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी केला विशेष करुन चि. शौर्य नितीन चिलवंत यांचे कौतुक केले त्याने पोस्ट कार्ड वाटप करुन पंतप्रधान ते प्रधानसेवक नरेंद्र मोदी प्रदर्शना संबधित अभिप्राय संकलित केले ते सर्व पत्र पंतप्रधानांन नवी दिल्ली येथे पाठविण्यात येणार आहेत. या प्रदर्शनास धाराशिवकारांनी व भाजप कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत ही प्रदर्शन यशस्वी करून दाखवले.












Users Today : 32
Users Yesterday : 67
This Month : 1824
Total Users : 27252