तुळजापूर – धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे उघडकीस आलेल्या बहुचर्चित ड्रग्ज प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात तामलवाडी पोलिसांनी एमडी ड्रग्जसह विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला अटक केली होती. तपासादरम्यान, या आरोपींचे विविध राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात एकूण 18 आरोपी या अगोदरच पकडले होते आता 19 वा आरोपी राहुल परमेश्वर कदम यालाही तुळजापूर पोलिसांनी अटक केली आहे.
तुळजापूर ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात 19 आरोपी निष्पन्न झाले असुन त्यातील 10 जण जेलमध्ये आहेत, 2 आरोपी फरार आहेत, 4 नावे गोपनीय असुन 2 आरोपी 5 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत तर 1 जण अटकेत आहे. आगामी काळात तपासात आरोपीच्या संख्येत वाढ होऊ शकते. एखाद्या एमडी ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात इतक्या मोठ्या संख्येने आरोपी निष्पन्न होण्याची ही राज्यातील एकमेव केस असावी, यात धाराशिव पोलिसांचे मोठे यश आहे.
विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेला विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. तर आज अटक करण्यात आलेला राहुल कदम परमेश्वर आणि सुमित शिंदे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या घराचे जिल्ह्यातील मुख्य नेत्याच्या छायाचित्रात दिसून येत आहे. त्यामुळे आता तुळजापूर ड्रगज प्रकरणात सर्वच पक्षाचे हात काळे झालेले दिसून येत आहेत.
तपासादरम्यान,राहुल कदम परमेश्वर या आरोपींच्या कुटुंबीयांचे पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे आढळले आहे.नागरिक आणि व्यापाऱ्यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला असून, तुळजापूरसारख्या पवित्र तीर्थक्षेत्री अशा प्रकारचे गैरकृत्य घडणे अत्यंत गंभीर असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
तुळजापूरमध्ये ड्रग्जचा सुळसुळाट वाढत असल्याने या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून दोषींना कठोर शासन करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.












Users Today : 22
Users Yesterday : 67
This Month : 1814
Total Users : 27242