स्थळ: धाराशिव शहरातील एक चहाटळ ठेला
व्यक्ती: पांडू (स्थानिक कार्यकर्ता), नाना (जेष्ठ राजकीय निरीक्षक)
पांडू: (गोड वाफाळता चहा घेत) ऐकला का नाना, तो एक दिवसाचा पीए आता सरनाईक साहेबांवरच डाव खेळायला निघालाय!
नाना: (हसत) हो का! काय झालं आता?
पांडू: अरे, त्याला स्वीय सहाय्यकपद मिळणार होतं, पण काही ‘काळे’ कारनामे बाहेर पडले. म्हणून ऑर्डर रद्द झाली. आता तोच साहेब, माजी आमदार, ओएसडी आणि सगळ्यांना बदनाम करत सुटलाय!
नाना: म्हणजे बाप्पा! एक दिवसाचं पीएपण आणि इतकी खदखद?
पांडू: हो रे! ‘श्रद्धा पॅटर्न’प्रमाणे स्वतःच कथा रंगवतोय आणि लोकांना सांगतोय, “माझ्याकडं खूप माहिती आहे…”
नाना: (तिरकसपणे) अरे पण सरनाईक साहेब तर पारदर्शक कारभारासाठी प्रसिद्ध. सर्व तालुक्यांना समसमान निधी वाटप, पक्ष न पाहता गावांच्या विकास कामांना मंजुरी… मग काय गडबड?
पांडू: अरे, म्हणूनच ना काही लोकांच्या पोटात काविळ झाली! कामं सुरळीत सुरू आहेत, म्हणून याला खूप जळतेय. त्याने ‘टोल’ घेऊन कमावल्याची चर्चाही आहे!
नाना: (हसून) म्हणजे आता बदनामीचं षड्यंत्र रचतोय? स्वतः रंगविलेल्या चर्चांना हवा देऊन…
पांडू: अगदी बरोबर! काही नेत्यांसमोर खुद्द आपलीच कथा सांगतो आणि म्हणतो, “ते असे आहेत, तसे आहेत…” आणि लोक तर ओळखून आहेत, हा कितीही नाटकं करो!
नाना: (थोडा गंभीर होऊन) पण हे असं अपप्रचाराचं राजकारण चांगल्या नेतृत्वाच्या आड येणं, हे जिल्ह्याच्या विकासालाच अडथळा ना?
पांडू: बरोबर बोललास नाना! हे ‘एक दिवसाचा पीए ते बदनामीचा मास्टरमाईंड’ प्रकरण चहा पाजायचं आणि विष कालवायचं असंच वाटतंय!
नाना: (डोळे मिचकावत) पण जनता सगळं पाहते आणि ओळखते… खरं ते उघडं पडल्याशिवाय राहत नाही पांड्या!
पांडू: (थाळी वाजवत) अगदी खरं! चहाचा घोट घेतो आणि बघ… पुढचा भाग आणखी रंगणार वाटतंय!
क्रमशः













Users Today : 30
Users Yesterday : 67
This Month : 1822
Total Users : 27250