काल व्हॅलेंटाईन डे साजरा झाला यादिवशी अनेक प्रेमी युगुल आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करतात मात्र राजकारणात देखील व्हॅलेंटाईन डे ला आगळ-वेगळं महत्व आहे. महाराष्ट्रात सध्या बीड जिल्हा कै.सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे गाजत आहे. यात मुख्य आरोपी असणारे लोक हे मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप अनेक दिवसापासून आ.सुरेश धस करत होते आणि त्यांनी महाराष्ट्रातील राजकारण देखील अनेक दिवसांपासून स्वतःभोवती या मुद्द्यावर फिरत ठेवलं होतं मात्र काल ना.धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांची भेट झाल्याची कबुली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.आमदार सुरेश धस यांनीही मी धनंजय मुंडे यांना भेटलो असून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटल्याचा दावा त्यांनी केला मात्र यामुळे राज्यात एक वेगळीच चर्चा सुरू झाली असून देशमुख कुटुंबियांनी देखील याबाबतीत नाराजी व्यक्त केली आहे.मनोज जरांगे पाटील हे देखील आमदार सुरेश धस यांच्यावर बरसले आहेत त्यामुळे ही भेट नेमकी कधी,कुठे झाली याबाबतीत स्पष्टता नसली तरी देखील भेट झाली हे मात्र निश्चित आह.
आमदार सुरेश धस यांनी गेल्या अडीच महिन्यात सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याकरिता रान उठवले होते त्या प्रकरणाची हवाच या भेटीमुळे निघून गेल्याची चर्चा आहे.












Users Today : 51
Users Yesterday : 81
This Month : 1708
Total Users : 27136