महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने कुटुंबास आर्थिक मदत..
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणाने हत्या करण्यात आली. या हत्येमधील एकही आरोपीला आम्ही सोडणार नाही अशी शासनाची भूमिका आहे. याबाबत विश्वास देण्यासाठी व देशमुख कुटुंबीयांना शासन त्यांच्यासोबत खंबीरपणे आहे ही हमी देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. शिवसेनेच्या वतीने देशमुख कुटूंबीयांना आर्थिक मदतही देण्यात आली. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. उदय सामंत यांनी गावकऱ्यांसोबत देखील चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या प्रकरणी एस आय टी गठीत करण्यात आलेली असून न्यायालयीन चौकशी देखील करण्यात येत आहे, त्यामुळे या प्रकरणात लवकरात लवकर दोषीना शिक्षा व्हावी तसेच देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत असेही उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.

आता नवनिर्वाचित महायुतीच्या मंत्रिमंडळातील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांशी भेट घेतली. यावेळी त्यांनी लोकांशी बोललो तेव्हा मलाही भीती वाटल्याची कबुली मंत्री शिरसाट यांनी दिली. परंतु या हत्याकांडामध्ये आरोपी अटक केल्यानंतर गुप्तता पाळली जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला राजकारणामध्ये आणू नका. विरोधक आणि सत्ताधारी काय म्हणतात, त्यामध्ये रस नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. यात देशमुख यांच्या हत्येमध्ये ज्यांचा हात असेल तो कोणीही असो, कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे’ असेही यावेळी मंत्री संजय शिरसाट म्हणाले आहेत.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने आर्थिक मदत
दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने संतोष देशमुख यांच्या कुटूंबियांना यावेळी आर्थिक मदत देण्यात आली. आणि पुढील घराची जबाबदारी सुद्धा घेतली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत व सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाठ, युवा सेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण, अविनाश जाधव, सुमित कोळपे, अजय सूरवसे, सुरज चुंगडे यांच्या हस्ते संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी, भाऊ धनंजय यांच्याकडे ही मदत सुपूर्द करण्यात आली.












Users Today : 32
Users Yesterday : 67
This Month : 1824
Total Users : 27252