भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक मजबुतीसाठी कळंब तालुका व वाशी मंडळ स्तरावर नवे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. कळंब शहर मंडळाच्या अध्यक्षपदी मकरंद पाटील, कळंब ग्रामीण पूर्व मंडळ अध्यक्षपदी अरुण चौधरी, कळंब ग्रामीण पश्चिम मंडळ अध्यक्षपदी दत्ता साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या सर्व नियुक्त्या भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या असून, पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविणे, संघटनात्मक बांधणी बळकट करणे, व लोकसंपर्क वाढविणे या दृष्टीने नविन अध्यक्षांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.
जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी नियुक्ती पत्रात म्हणाले की,

“नविन मंडळ अध्यक्षांनी पक्षाच्या मूलभूत विचारधारेचा प्रसार करताना पारदर्शक व विश्वासार्ह नेतृत्व उभे करावे. कार्यकर्त्यांमध्ये एकसंघपणा व सक्रियता वाढवून पक्षसंघटनेला भक्कम करण्यासाठी त्यांनी सातत्याने मेहनत घ्यावी.”
या नव्या नियुक्त्यांमुळे कळंब परिसरातील भाजप संघटना अधिक मजबूत होईल आणि आगामी राजकीय वाटचालीसाठी ठोस पाया तयार होईल, असा विश्वास पक्षातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.












Users Today : 22
Users Yesterday : 67
This Month : 1814
Total Users : 27242