धाराशिव, पुष्पक मंगल कार्यालय येथे भव्य नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या महोत्सवाचा शुभारंभ आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी या प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधत तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

या मेळाव्यास २२०० हून अधिक इच्छुक उमेदवारांची उपस्थिती होती. त्यापैकी ४७८ उमेदवारांना ऑफर लेटर मिळाले, तर ५०३ उमेदवारांना शॉर्टलिस्ट करून अंतिम मुलाखतीसाठी कंपनीत बोलावण्यात आले. तसेच ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांना येत्या वर्षभर त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराच्या संधींबाबत माहिती देण्यात येणार आहे.

या महोत्सवात ५२ हून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला व उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या महोत्सवाचे आयोजन भाजपचे युवा नेते शंतनू पायाळ यांनी केले होते. सर्व कंपन्यांच्या मुलाखतींचे नियोजन व मुलाखतीची प्रक्रिया जॉब फेअर इंडियाच्या संचालिका तस्मिया शेख यांनी केली.

स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी विविध शासकीय महामंडळांच्या योजनांची माहिती आणि मार्गदर्शन देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले होते.
जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुराच्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, तरुण-तरुणींच्या हाताला काम मिळावे, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. येत्या काळातही अशा प्रकारचे नोकरी व स्वयंरोजगार महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील,माजी खासदार सुधाकरराव शृंगारे, दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे, शंतनू पायाळ, विकास बारकूल, खंडेराव चौरे, अमित शिंदे, सुनील काकडे, अभय इंगळे, राहुल काकडे, अस्मिताताई कांबळे, प्रीतीताई कदम, उषाताई येरकळ, विद्या माने, नीलकंठ पाटील, संदीप इंगळे, सनी पवार, नितीन शेरखाने, सागर दंडनाईक, मदन बारकूल, कुणाल निंबाळकर, पुष्पकांत माळाले, गोपाळ कदम, तसेच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, प्रा. चंद्रजीत जाधव यांच्यासह जिल्हाभरातून आलेले तरुण-तरुणी व कार्यकर्ते उपस्थित होते.













Users Today : 17
Users Yesterday : 77
This Month : 1593
Total Users : 27021