भूम प्रतिनिधी-‘भूम परंडा वाशीच बोला,एकत्रित चला’ या टॅगलाईन खाली मी ४१ दिवसांचा भूम परंडा वाशीचा २४८ गावांचा दौरा करत असून यामध्ये या दौऱ्याचा चौथा दिवस आहे. यामध्ये जवळपास 30 गावाच्या आसपास गावात भेटी दिल्या असून यामध्ये अनेक लोकांच्या समस्या दिसून आल्या आहेत.ग्रामीण भागात शाश्वत पाणी, रस्ते व वीज या मूलभूत प्रश्नासह बेरोजगारी, तरुण मुलांची होत नसलेले लग्न हे प्रश्न देखील खूप मनाला चिंतन करायला लावण्यासारखे दिसून येत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी भूम येथील शासकीय विश्राम येथे आयोजित केलेल्या पत्रकार संवाद या कार्यक्रमात व्यक्त केले.
महायुतीवर नाराजी असून ही नाराजी लोकसभेला मतांच्या रूपात दिसून आली आहे. विधानसभेत देखील नक्कीच परिवर्तन होईल व या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. मी गेल्या दहा वर्षापासून सातत्याने जनतेच्या संपर्कात असून लोकांच्या सुखदुःखात कायम सोबत आहे तसेच माझ्या परीने जे मला जमेल तशी व्यक्तिगतरित्या मदत करत आहे. ग्रामीण भागात आरोग्य शिबिरे,महिला मेळावे,गुणवंत विद्यार्थी सत्कार, मतदारसंघातील अनेक गावात अन्नधान्य वाटप यासारख्या अनेक उपक्रम राबवत आहे व यापुढे देखील हे काम करत राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदपवार साहेब यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांच्या सूचनेवरून मी हा दौरा करत असून २४८ गावांचा दौरा झाल्यानंतर त्यांच्यापर्यंत या दौऱ्याचा अहवाल सादर करून मी भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी यापूर्वीही त्यांच्याकडे मागितली आहे व दौरा झाल्यानंतर देखील मागणी पक्षश्रेष्ठीकडे करणार आहे.मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे.त्यामुळे उमेदवारी जर मला मिळाली तर मी निश्चितपणाने याठिकाणी निवडून येईल मला महाविकास आघाडीच्या घटक पक्षासह इतर समविचारी पक्षांचा, संघटनांचा व महत्त्वाच्या व्यक्तींचा देखील पाठिंबा असून अनेक नेते व कार्यकर्ते मला भेटून विधानसभा निवडणुकीत सोबत राहण्याचे वचन देत आहेत.परंतु ही जागा महाविकास आघाडी घटक पक्षातील इतर पक्षाला मिळाली किंवा आमच्याच पक्षातील इतर कोणाला मिळाली तरी देखील मी त्यांचे काम मनापासून करणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.












Users Today : 32
Users Yesterday : 67
This Month : 1824
Total Users : 27252