बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या सलग तीन वेळा आमदार असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या डॅशिंग नेत्या आमदार मंदा म्हात्रे यांची सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे संजय शिरसाट यांना या पदावरून हटवले गेले आहे.त्यानंतर आता नवीन अध्यक्ष कोण होणार याची चर्चा सध्या मुंबईत सुरु आहे.
राजकीय कट्टाला मिळालेल्या विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या पदावर बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.आ.मंदा म्हात्रे या भारतीय जनता पार्टीच्या एकनिष्ठ आमदार म्हणून परिचित असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्या नजीकच्या मानल्या जातात.
त्यामुळे सिडको सारख्या प्रतिष्ठित आणि मुंबई,ठाणे या भागाचे राजकारण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे सिडको महामंडळ आपल्या ताब्यात असावे व त्या पदावर आपल्या मर्जीतील व्यक्ती बसावा अशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही असणार म्हणूनच या पदावर आमदार मंदा म्हात्रे यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.













Users Today : 30
Users Yesterday : 67
This Month : 1822
Total Users : 27250