भूम येथील विराट गर्दीच्या साक्षीने प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे मतदारांना आवाहन
विजयावर शिक्कामोर्तब करणारी ठरली भूम येथील अलोट गर्दीची महानिर्धार सभा

भूम – आपल्या राजकीय विरोधकांकडे विकासाचा मुद्दाच नाही, माजी आमदाराकडून येणार्या पाच वर्षांत काय करणार? हा वचननामा कधी ऐकला आहे का? प्रचार सुरू झाल्यापासून हा माजी आमदार विकासावर एक वाक्य बोलला असेल तर एक लाखाचे बक्षीस देतो. यांच्याकडे विकासाचे मुद्देच नाही, नात्यागोत्याचे व वारसाचे राजकारण हे लोकं आजपर्यंत करत आलेत. एकाचा बाप आमदार होता, एकाचा बाप खासदार होता. एका बाजूने कष्टातून वर आलेली आम्ही विस्थापितांची लेकरं, आणि तिकडे बापजाद्यांपासून राजकारणात असलेले प्रस्थापित. मतदारसंघाचा विकास पाहिजे असेल, रोजगार व पोटापाण्यासाठी मुंबई, पुण्याला गेलेली तुमची लेकरं परत गावात आणायची असेल, आपले तालुके पश्चिम महाराष्ट्रासारखे सुजलाम सुफलाम करायचे असतील, तर धनुष्यबाणासमोरील बटण दाबून या तानाजी सावंतला मोठ्या मताधिक्क्याने विधानसभेत पाठवा, असे जाहीर आवाहन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री व महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी केले. भूम येथे महायुतीची महानिर्धार सभा प्रचंड गर्दीच्या साक्षीने पार पडली. ही गर्दीच तानाजीराव सावंत यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी ठरली. याप्रसंगी आपल्या घणाघाती भाषणात प्रा. डॉ. तानाजीराव सावंत हे बोलत होते. याच सभेतून महायुतीच्या उपस्थित नेत्यांनीदेखील विरोधकांवर तुफान टीकास्त्र डागले.

आपल्या घणाघाती भाषणात तानाजीराव सावंत म्हणाले, की समोरच्या उमेदवारावर गुन्हेगारीच्या किती केसेस आहेत, ते एकदा बघा. तानाजी सावंतवर एकही गुन्हा नाही, हा सावंत कोरा आहे. याच्या आमदारकीच्या काळात केंद्र, राज्य व गावागावात याची सत्ता असताना, याला ‘उजनी’चे पाणी आणता आले नाही. याच्याकडे मतदारसंघाच्या विकासाचे काय धोरण आहे? आम्ही मतदारसंघाचा विकास करताना दवाखाने उभारले, नगरपरिषद व ग्रामपंचायतीला निधी देऊन गटार, रस्ते, पाणी पुरवठा आदी योजना राबवून प्रश्न मार्गी लावले. चांगले काही निर्मिती करण्यासाठी रक्तातच गुण असावा लागतो, २८८ आमदारांतून निधी खेचून आणण्यासाठी मनगटात धमक असावी लागते, असा टोलाही त्यांनी माजी आमदार राहुल मोटे यांना यावेळी लगाविला. माजी आमदाराने ३५ वर्षे तुम्हाला टोप्या घालण्याचे काम केले, मतदारसंघात पाणी आणू शकला नाही, मी सत्तांतर घडवून ‘उजनी’चे पाणी सीना कोळेगावात आणले नसते तर ते बारामतीला गेले असते. मी दिलेले पाणी आणण्याचे वचन पूर्ण केले आहे, हा तानाजी सावंत मतदारसंघासाठी काहीही करू शकतो. पुढील पाच वर्षाचे जे ‘व्हिजन’ मी तुमच्यासमोर मांडले आहे, ते जर पूर्ण केले नाही तर मला धाराशिवच्या शिवेमध्येदेखील येऊ देऊ नका, असेदेखील याप्रसंगी तानाजीराव सावंत यांनी नीक्षून सांगितले.

आम्ही आधी करतो मग सांगतो, असे सांगून सावंत म्हणाले, की भारतात सर्वप्रथम आपण ‘गाव तेथे स्मशानभूमी’ ही योजना राबवली. साडेपंधराशे गावांत स्मशानभूमी बांधल्या. माजी आमदाराने गेल्या १५ वर्षांत एखाद्या रेशनकार्डसाठी तरी कधी कुणा अधिकार्याला फोन लावला का? सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा, त्याच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ‘जनता दरबार’ घेऊन लोकांचे प्रश्न जागच्याजागी मार्गी लावले. २० तारखेला तुम्ही मतदान करा, २३ तारखेला महायुतीचे बहुमताने सरकार येणार आहे, २६ तारखेला शपथविधी होणार आहे. आणि, पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शेतकर्यांचा सातबारा कोरा करून तुमच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे उतविले जाणार आहे, असेही याप्रसंगी प्रा. डॉ. सावंत यांनी सांगून, लाडक्या बहिणीचे १५०० रूपयांचे पाच हजार रूपयेदेखील आमचेच सरकार करणार आहे, आम्ही घेणारे नाही तर देणारे आहोत. मतदारसंघात धवलक्रांती, हरितक्रांती व औद्योगिक क्रांती घडविण्यासाठी व आपल्या भागाचा विकास घडवून आणण्यासाठी लाखोच्या लीडनेच निवडून द्या, असे आवाहनही प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी उपस्थित जनसमुदयाला केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामराजे साळुंके, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव भोईटे, रिपाइंचे नेते संजयकुमार बनसोडे, भागवत शिंदे, श्री जगदाळे, शिवसेनेचे नेते तथा माजी नगराध्यक्ष संजयनाना गाढवे यांचेही घणाघाती भाषणे झालीत. त्यांनी विरोधकांवर चांगलेच राजकीय आसूड ओढले. या सभेला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, प्रसिद्ध शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अर्चनाताई दराडे, शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ, बाळासाहेब पाटील हांडोग्रीकर, रिपाइंचे मराठवाडा उपाध्यक्ष भागवत शिंदे, माजी नगराध्यक्षा सौ. संयोगिता गाढवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रामराजे साळुंके, शिवसेना नेते अण्णासाहेब देशमुख, भाजपचे नेते काकासाहेब चव्हाण, आदम शेख, ज्येष्ठ नेते महादेवदादा अंधारे, शिवाजीअण्णा भोईटे, शिवाजीराव भडके, महादेव वारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नीलेश श्ोळवणे, भाजप कामगार सेलचे मराठवाडा सदस्य सचिन बारगजे, शिवसेना नेते दिलीप तेलंग, अॅड. रवींद्र गुळवे आदींसह महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने महिला, पुरूष व तरूणवर्गाची उपस्थिती होती.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामराजे साळुंके, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव भोईटे, रिपाइंचे नेते संजयकुमार बनसोडे, भागवत शिंदे, श्री जगदाळे, शिवसेनेचे नेते तथा माजी नगराध्यक्ष संजयनाना गाढवे यांचेही घणाघाती भाषणे झालीत. त्यांनी विरोधकांवर चांगलेच राजकीय आसूड ओढले. या सभेला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, प्रसिद्ध शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अर्चनाताई दराडे, शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ, बाळासाहेब पाटील हांडोग्रीकर, रिपाइंचे मराठवाडा उपाध्यक्ष भागवत शिंदे, माजी नगराध्यक्षा सौ. संयोगिता गाढवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रामराजे साळुंके, शिवसेना नेते अण्णासाहेब देशमुख, भाजपचे नेते काकासाहेब चव्हाण, आदम शेख, ज्येष्ठ नेते महादेवदादा अंधारे, शिवाजीअण्णा भोईटे, शिवाजीराव भडके, महादेव वारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नीलेश श्ोळवणे, भाजप कामगार सेलचे मराठवाडा सदस्य सचिन बारगजे, शिवसेना नेते दिलीप तेलंग, अॅड. रवींद्र गुळवे आदींसह महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने महिला, पुरूष व तरूणवर्गाची उपस्थिती होती.











Users Today : 29
Users Yesterday : 67
This Month : 1821
Total Users : 27249