आळणी, धाराशिव : डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल, आळणी, धाराशिव येथील एस.बी.एन.एम. कॉलेज ऑफ फार्मसी येथे डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये यांच्या ‘मिशन १०० दिवस’ अभियानांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव यांच्या वतीने २५ मार्च २०२५ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरज ननवरे यांनी विद्यार्थ्यांना शिबिराबद्दल माहिती दिली. यापुढे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव यांच्या सोबत राहून शासनाच्या आरोग्य विभागातील विविध योजना व उपक्रम सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात अवयवदानाबद्दल माहिती दिली गेली तसेच मौखिक आरोग्य, लठ्ठपणा आणि थायरॉईड यांसारख्या तपासण्या करण्यात आल्या. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला.
आरोग्य तपासणी शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. डॉ. दीपक निंभोरकर (सहाय्यक प्राध्यापक, पी.एस.एम. विभाग) यांनी अवयवदानाबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. शीतजा बनसोडे (सहाय्यक प्राध्यापक, दंत विभाग), डॉ. शीतल पिसाळ (सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय विभाग), डॉ. मनेश खंडागळे, प्रज्ञावंत रणदिवे, प्रणाली सातदिवे, अक्षय होटकर (समाजसेवा अधीक्षक) आणि मिशन थायरॉईड स्क्रिनिंग तंत्रज्ञ यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. या शिबिरात एकूण १२५ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
शिबिरात तज्ज्ञांनी अवयवदान आणि तोंडी आरोग्य यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच लठ्ठपणा आणि थायरॉईड यांसारख्या गंभीर आजारांबद्दल माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
आरोग्य शिबिराच्या प्रस्तावना समन्वयक प्रा. सोहेल तांबोळी यांनी केली. आरोग्य तपासणीसाठी आलेल्या संपूर्ण टीमचे प्रा. धस पी. बी. यांनी आभार मानले. शिबिरास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.












Users Today : 22
Users Yesterday : 67
This Month : 1814
Total Users : 27242