दोन लाखांची मदत रुग्णालयात जाऊन कुटुंबाकडे केली रक्कम सुपूर्द.
बीड शहरातील शिवाजी नगर परिसरातील तीन वर्षीय चिमुकलीच्या शरीरावर गरम पाणी पडले होते. यात सदर चिमुकली 60 टक्के भाजली होती. तिच्यावर बीडच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आराध्या दिनेश ढेंगे असं गंभीर रित्या भाजलेल्या चिमुकलीचे नाव आहे.

दि. 24 ऑगस्ट रोजी सकाळी आराध्या स्नान करण्यासाठी स्नान गृहात गेली होती. यावेळी तिचे पाय घासरले. बाजूलाच बकेट मध्ये गरम पाणी होते. अंगावर उकळते पाणी पडल्याने यात ती गंभीर जखमी झाली होती. आराध्या हीचे वडील रोजंदारी चे काम करतात. आराध्या 60 टक्के भाजल्याने तिच्यावर लाईफ लाईन या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटना आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांना समजली. आरोग्य मंत्र्यांनी थेट दोन लाख रुपयांची मदत सुपूर्द केली आहे.
अशोक रोमन यांनी केला पाठपुरावा….
आराध्या हीला मदत मिळाली पाहिजे असे अनेक पोस्ट सोशल मीडियातून समोर आले होते. अनेकांनी मदतीचा हात देखील समोर केला. मात्र खर्च जास्त असल्याने ढेंगे कुटुंब हतबल झाले होते. मराठा समन्वयक अशोक रोमन यांना ही घटना समजताच त्यांनी थेट आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या कानावर हा प्रकार घातला. आज आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांनी थेट दोन लाखांची मदत अशोक रोमन यांच्या मार्फत त्या कुटुंबाला सुपूर्द केली.
आराध्याच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर…
अशोक रोमन यांच्या मार्फत आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांनी थेट दोन लक्ष रुपयांची मदत पाठविली. मदत सुपूर्द करताना चिमुकली आराध्या हिच्या कुटुंबीयांचे डोळे पाणावले. कुटुंबाने हात जोडून आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांचे आभार मानले.
आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांचे हे कार्य केवळ आर्थिक मदत नव्हे, तर त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे दर्शन आहे. त्यांच्या या संवेदनशीलतेमुळे आराध्या आणि तिचे कुटुंब पुन्हा उभे राहू शकतील, ही खूप सकारात्मक बाब आहे.